Just another WordPress site

कितीही गाड्या केल्या तरी संध्याकाळी गर्दी ही कोणाच्या मेळाव्याला होईल हे कळलेच

उद्धव ठाकरे समर्थक शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांचा खोचक टोला

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांनी तब्बल दोनशे गाड्या पाचोरा शहरातून रवाना करण्यात आल्या आहेत.यावरूनच वैशाली सूर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. कितीही गाड्या केल्या तरी संध्याकाळी गर्दी ही कोणाच्या मेळाव्याला होईल हे कळलेच असा खोचक टोला आ.किशोर पाटील यांना लगावला आहे.शिवसेनेत फूट पडल्यामुळे यंदा मुंबईत उद्धव ठाकरे गटाचा तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचा असे दोन स्वतंत्र दसरा मेळावे पार पडत आहेत.दसरा मेळाव्यासाठी पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील यांच्यातर्फे जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे.दुसरीकडे त्यांच्याच भगिनी उद्धव ठाकरे समर्थक शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी शिवसेना कार्यकर्त्यांच्या आरोग्यासाठी योग शिबिराचे आयोजन केले  आहे.कार्यकर्त्यांना घेवून जाण्यासाठी गाड्यांची आवश्यकता नाही.यासाठी कार्यकर्त्यांच्या मनात आतून भावना असल्या पाहिजे असा खोचक टोलाही ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांचे बंधू शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना लगावला आहे.

दसरा मेळाव्यासाठी जे कार्यकर्ते मुंबईत जाऊ शकले नाहीत त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी उद्धव ठाकरे समर्थक शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांचे वडील कट्टर शिवसैनिक स्वर्गीय आर.ओ.पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून पाचोरा शहरात भव्य अशा योग शिबिराचे आयोजन केल्याचे पाहायला मिळाले.पाच दिवसीय योग शिबिराला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.जे निष्ठावान शिवसैनिक आहे.त्यांना मुंबईच्या दसरा मेळाव्यासाठी गाडी घोडीची कुठलीही आवश्यकता नाही.असे जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते हजारोंच्या संख्येने उत्स्फूर्तपणे मुंबईच्या उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी रवाना झाले आहेत.दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावर बसेस तसेच वाहनांमधून कार्यकर्त्यांना मुंबईच्या मेळाव्यासाठी नेले जात आहे.तब्बल ४०० रुपये रोजंदारी ही मेळाव्यासाठी जाणाऱ्या नागरिकाला दिली जात असल्याची शोकांतिका आहे.दसरा मेळाव्याला असे यापूर्वी कधी घडले  नव्हते अशी टीका उद्धव ठाकरे समर्थक शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांच्यासह इतर आमदारांवर केली आहे.कितीही गाड्या घोड्या केल्या तरी गर्दी मात्र उद्धव ठाकरे यांच्याच मेळाव्यालाच होणार आहे असे  म्हणत शक्तिप्रदर्शन करणारे आमदार किशोर पाटील यांना उद्धव ठाकरे समर्थक वैशाली सूर्यवंशी यांनी नाव न घेता जोरदार टोला लगावला आहे. तसेच मी मेळाव्याला जाऊ शकले नाही.मात्र माझे वडील कट्टर शिवसैनिक आर. ओ. पाटील यांच्या विचारानुसार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सुदृढ करण्यासाठी योग शिबिर घेतल्याचेही वैशाली सूर्यवंशी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.