Just another WordPress site

“मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार..मी कोठेच गुंतू शकत नाही..मला कोणाचाही पाठिंबा नाही”

आंदोलन एसआयटी चौकशी वरून मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

संभाजीनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२७ फेब्रुवारी २४ मंगळवार

विधिमंडळात आज दि.२७ फेब्रुवारी मंगळवार रोजी मनोज जरांगेंचे उपमुख्यमंत्र्यांवरील आरोप,त्यांची भूमिका आणि मराठा आरक्षण या मुद्द्यांवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले.मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी जेसीबी लावण्यात आल्या.एवढे पैसे कोठून आले.मनोज जरांगे हे खासदार शरद पवार यांच्या संपर्कात होते.आमदार राजेश टोपे यांच्या कारखान्यावर बैठका झाल्या असा दावा भाजपाच्या नेत्यांनी केला असून या आरोपांनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाणार आहे यावर आता खुद्द मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे.ते संभाजीनगरात आज दि.२७ फेब्रवारी रोजी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.मनोज जरांगे म्हणाले की, माझ्याविरोधात एसआयटीची चौकशी लावण्यात आली.मी गरीब मराठ्यांचे काम करत आहे.देवेंद्र फडणवीस हे सत्तेचा वापर करत असून त्यांनी काय करायचे ते करू द्या कारण माझा कोठेही दोष नाही.मी मागेच मराठा समाजाला सांगितले की फडणवीसांसाठी मी एक काटा असून सरकार आणण्यासाठी मला त्यांना गुंतवायचे आहे.

“मी कोठेही जायला तयार आहे.अरे तुम्ही कोणतीही चौकशी करा.मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे.मी भेकड असतो तर गप्प बसलो असतो.मी कोठेच गुंतू शकत नाही.मला कोणाचाही पाठिंबा नाही.मला कोणीही पैसे दिलेले नाहीत.मला कोणीही फोन केलेला नाही.तुम्ही एसआयटी चौकशी करणार असाल तर तुमचेच मला आलेले फोन बाहेर येतील.त्यांनी मला अनेकवेळा कॉल केलेले आहेत मग मी पण ते कॉल बाहेर काढतो.होऊन जाऊ द्या मग.कर नाही त्याला डर कशाला पाहिजे.माझ्यासाठी जात हे दैवत आहे.मला तुम्ही आता बोलावले तरी मी सलाईन हातात घेऊन चौकशीसाठी येईल अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.मला माहिती आहे मी निर्दोष आहे.माझ्याविरोधात काहीच सापडू शकत नाही.मला कोणत्याही नेत्याचा पाठिंबा नाही.माझ्या स्वागतासाठी मराठा समाजाने जेसीबी लावलेल्या आहेत.मराठा समाज एवढा कमजोर आहे का ? कष्ट करतो त्यामुळे काहीही अडचण नाही असे देखील विधान जरांगे यांनी केले आहे.एसआयटी चौकशी करणार असाल तर सर्व चौकशी करा.पोलिसांचीही चौकशी केली पाहिजे.अगोदर हल्ला कोणी केला हेही तपासा.हल्ल्याचा आदेश देणाऱ्या मंत्र्यांचीही चौकशी करा.गिरीश महाजन यांनी कॉल केला होता ती रेकॉर्डिंग बाहेर काढा मग गृहमंत्र्यांपर्यंत सगळेच गुंतून जातील असा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.