Just another WordPress site

“घराणेशाही जर कुणी वाढवली असेल तर तो भाजपा आहे”-घराणेशाहीच्या आरोपावर संजय राऊत यांचे प्रत्युत्तर

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२८ फेब्रुवारी २४ बुधवार

इंडिया आघाडीत जागावाटपासंदर्भात कुठलाही संदर्भ नसून ओरबडण्याचे आमचे धोरण नाही.काल मंगळवारच्या बैठकीत पृथ्वीराज चव्हाणही होते व त्यांची भूमिकाही हीच आहे.आम्हाला जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत.वंचित बहुजन आघाडीनेही मान्यता दिली असून  महाराष्ट्रातल्या जागा जिंकून आपल्याला संविधानावरचा हल्ला परतवून लावायचा आहे असे संजय राऊत म्हणाले आहेत.काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस,वंचित बहुजन आघाडी आम्ही सगळे एकत्र आहोत.तुतारी आणि मशाल लोकांपर्यंत पोहचली आहे.प्रचार तर आम्ही करणारच आहोत.डिजिटल युगात चिन्ह पोहचायला फार वेळ लागत नाही.शरद पवारांच्या पक्षाला तुतारी चिन्ह मिळाले असून आम्हाला मशाल चिन्ह मिळाले आहे ज्यांना धनुष्यबाण मिळाला त्या धनुष्याची जागा जागेवर आहे का ? तसेच घड्याळ ज्यांना मिळाले ते घड्याळ चालू आहे का ? हे बघावे लागेल असे संजय राऊत म्हणाले.

अमित शाह इंडिया आघाडीत घराणेशाही म्हणत असतील तर त्यांचे वक्तव्य हास्यास्पद असून घराणेशाही इंडिया आघाडीत नाही तर भाजपात आहे.जय शाहने विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर्स मारले आहेत का ? सचिनपेक्षा जास्त शतक ठोकली आहेत का ? की त्यांना बीसीसीआयचे  अध्यक्ष केले ? अमित शाह गृहमंत्री नसते तर जय शाह हे बीसीसीआयमध्ये असते का ? घराणेशाही म्हटले जाते तेव्हा घराण्याची प्रतिष्ठा आहे. ठाकरे घराण्याला प्रतिष्ठा आहे व या प्रतिष्ठेचा फायदा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाही झाला आहे.आम्ही स्वार्थाचे राजकारण करत नाही. शरद पवारांची घराणेशाही आहे का ? त्यांनी कृषी क्षेत्रात,सामाजिक क्षेत्रात काम केले आहे त्याचा गौरव तुमच्या सरकारने केला आहे. घराणेशाही जर कुणी वाढवली असेल तर तो भाजपा आहे ज्याला कुटुंब असतो तो घराणेशाहीच्या गोष्टी बोलतात.

Leave A Reply

Your email address will not be published.