Just another WordPress site

यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैज्ञानिक अधिकारी नानासाहेब घोडके यांच्या सेवानिवृत्तीपर निरोप समारंभ

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१ मार्च २४ शुक्रवार

“आठवणी ठेवल मित्रांनो सांभाळून ! एक क्षण हा मोलाचा कसा सांभाळु !! या क्षणाच्या आठवणी डोळ्यातुन पडतील त्या कशा सावरू !!” अशाच आपल्या रूग्णसेवेच्या आठवणी सोबत ठेवुन येथील यावल ग्रामीण रुग्णालयातील प्रयोगशाळेतील वैज्ञानिक अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले नानासाहेब शंकर घोडके हे आपल्या प्रर्दीघ शासकीय सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत एका निरोप समारंभात त्यांना नुकताच निरोप देण्यात आला.सदरील कार्यक्रम येथील पद्दमावती लॉन धनश्री चित्र मंदिर येथे संपन्न झाला.

यावल ग्रामीण रूग्णालयात शासकीय अधिकारी म्हणुन सामाजिक बांधीलकीतुन उत्कृष्ट व निस्वार्थ अशी आपली सेवा बजावणारे प्रयोगशाळा वैज्ञानिक नानासाहेब शंकर घोडके यांना त्यांच्या ३१ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. नानासाहेब यांनी आपली प्रशासकीय सेवा १९९२ पासून नवापुर जिल्हा धुळे या ठीकाणाहुन केली त्यानंतर त्यांनी १९९५ रूग्णालय पुणे,१९९६ मुक्ताईनगर,जळगाव व त्यानंतर वर्ष १९९९ पासुन सलग २४ वर्ष त्यांनी यावल व न्हावी रुग्णालयात आपली सेवा बजावली.निस्वार्थ व सेवाभावी वृत्तीने आपली प्रशासकीय सेवा देणारे अधिकारी नानासाहेब घोडके यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमास माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी,यावलचे प्रथम लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष शशांकदादा देशपांडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुषार उर्फ मुन्नाभाऊ पाटील,यावल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रा.संध्या सोनवणे,धंनजय शिरीष चौधरी,यावलचे माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले,कॉंग्रेस कमेटीचे शहर अध्यक्ष कदीर खान,वढोदे येथील सरपंच संदीप सोनवणे,भगतसिंग पाटील,पत्रकार भरत कोळी,डॉ.विजय कुरकुरे,डॉ.तुषार सोनवणे,डॉ.प्रशांत जावळे यांच्यासह मित्रपरिवार व त्यांचे सह कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.