Just another WordPress site

“भाजपाने देशात १५० जागा जिंकून दाखवाव्या”-प्रकाश आंबेडकर यांचे खुले आव्हान

अकोला-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१ मार्च २४ शुक्रवार

आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकतो.ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीत जागावाटपाला वेग आला आहे.नुकतेच २७ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक झाली.या बैठकीत जागावाटपाच्या सूत्रावर चर्चा करण्यात आली.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधीही उपस्थित होते. दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी याच लोकसभा निवडणूक आणि भाजपाची रणनीती महत्त्वाचे विधान केले आहे.भाजपाने देशात १५० जागा जिंकून दाखवाव्यात असे आव्हानच प्रकाश आंबेडकरांनी दिले आहे.भाजपाने फक्त १५० जागा जिंकून दाखवाव्यात.निवडणुकीच्या मैदानात त्यांनी १५० जागा जिंकल्या तरी फार मोठी गोष्ट आहे असे मी मानतो.भाजपाला चुकीची माहिती मिळत आहे.पक्ष फोडून आम्ही ४०० पेक्षा अधिक जागा जिंकू असे त्यांना वाटत आहे.ते पक्ष फोडू शकतील,नेते विकत घेऊ शकतील मात्र ते मतदारांना विकत घेऊ शकणार नाहीत.मतदार त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांत उभी फूट पडली.बंड केलेले दोन्ही गट आता महाराष्ट्रात भाजपाशी युती करून सत्तेत सहभागी आहेत.शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन महत्त्वाच्या पक्षांत पडलेली उभी फूट ही भाजपासाठी फायद्याची आहे.महाराष्ट्रासह इतर राज्यांतही काँग्रेस तसेच इतर पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना भाजपात प्रवेश दिला जातोय.बडे नेते पक्षात येत असल्यामुळे तसेच देशात पंतप्रधान मोदींचा मोठा प्रभाव असल्यामुळे आम्ही देशात ४०० पेक्षा अधिक जागा जिंकू असा दावा भाजपाकडून केला जातोय.दरम्यान २ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ट्रायडंट हॉटेलवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली होती.या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समावेश करून घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली होती त्याआधी प्रकाश आंबेडकर आणि नाना पटोले यांच्यात राजकीय मतभेद झाले होते त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला मविआत जागा मिळेल की नाही याबाबत साशंकता होती परंतु मतभेद विसरून काँग्रेस,शरद पवार गट आणि ठाकरे गटाने वंचित बहुजन आघाडीला हिरवा कंदील दाखवला आणि महाविकास आघाडीत समावेश करून घेण्यात आले.
Leave A Reply

Your email address will not be published.