Just another WordPress site

राज्यात आज ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२ मार्च २४ शनिवार

उन्हाळा सुरू झाला तरी अवकाळी पाऊस मात्र पाठ सोडायला तयार नाही.पावसाळ्यात देखील राहत नसतील इतके ‘अलर्ट’ हा अवकाळी पाऊस देत आहे.आता पुन्हा एकदा हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.मागील आठवड्यापासूनच राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वादळी वारा आणि गारपीटीसह अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे सदरहू या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांना सावरण्याची एकही संधी न देता पुन्हा एकदा पावसाने त्याच्या आगमनाची वर्दी दिली आहे.उपराजधानीत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.नागपूरसह विदर्भातील बुलढाणा,अकोला,अमरावती या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर मराठवाड्यात देखील परभणी,बीड,हिंगोली आणि मध्य महाराष्ट्रात पुणे तसेच नगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आज शनिवारी विदर्भातील नागपूर,अमरावती,अकोला,वर्धा,गोंदिया,भंडारा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे.वाशीम,यवतमाळ जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज आहे तसेच मराठवाड्यात जालना,बीड,परभणी,नांदेड,हिंगोली,खानदेशात जळगाव व धुळे जिल्ह्यात पावसाचा इशारा आहे. कोकणातही काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.दरम्यान नाशिक,धुळे,जळगाव,छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.