Just another WordPress site

“आमचे हिंदुत्त्व हे घरातली चूल पेटवणारे तर भाजपाचे हिंदुत्त्व हे घर पटेवणारे “-उद्धव ठाकरे यांची भाजपावर सडकून टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.४ मार्च २४ सोमवार

आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते ही निवडणूक लक्षात घेता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतायत.उद्धव ठाकरे यांनीदेखील एका जाहीर सभेला संबोधित करताना भाजपावर सडकून टीका केली.भाजपा आणि आमचे हिंदुत्त्व वेगळे आहे व भाजपा ४०० जागा कशी जिंकते तेच मी पाहतो असे उद्धव ठाकरे म्हणाले.याआधीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेच्या युतीने ४२ खासदार निवडून दिले नसते तर भाजपाला दिल्लीचे तख्त राखता आले नसते.आता दिल्लीचे तख्त पहिल्यांदा फोडावे लागेल आणि तिथे आपले तख्त बसवावे लागेल.अबकी बार ते ४०० पार असे सांगत आहेत.मी तर म्हणतो की अबकी बार भाजपा तडीपार करुया.तुम्ही ४०० पेक्षा अधिक जागा कसे जिंकतात तेच मी पाहतो असे आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिले आहे.

भाजपाने आमचा विश्वासघात केला असा आरोपही उद्धव ठाकरेंनी भाजपावर केला.अरे गेल्या वेळेला महाराष्ट्राने ४० ते ४२ खासदार निवडून दिले नसते तर भाजपाला २५० पेक्षा अधिक जागा जिंकता आल्या नसत्या.भाजपाने दोन वेळा आमचा विश्वासघात केला असे ठाकरे म्हणाले.आम्हाला भाजपाचे हिंदुत्त्व मान्य नाही.आमचे हिंदुत्त्व वेगळे आहे असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितले.आम्ही हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर भाजपासोबत होतो मात्र भाजपाचे आणि आमचे हिंदुत्त्व खूप वेगळे आहे.मला भाजपाचे हिंदुत्त्व मान्य नाही.आज समाजवादी विचारांचे सगळे लोक माझ्यासोबत आले आहेत.मुस्लीम लोकही आज माझ्यासोबत आहेत कारण आमचे हिंदुत्त्व हे घरातली चूल पेटवणारे तर भाजपाचे हिंदुत्त्व हे घर पटेवणारे  आहे.आमचे हिंदुत्त्व हे संत गाडगेबाबा यांचे हिंदुत्त्व आहे.जो तहाणलेला असेल त्याला पाणी देणे,जो भुकेला असेल त्याला अन्न देणे,ज्याला घर नाही त्याला घर देणे हे आमचे हिंदुत्त्व आहे असे ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.