Just another WordPress site

यावल वन कास्ट्राईब संघटना जिल्हा सचिवपदी राकेश निकुंभे तर जिल्हा कार्यध्यक्षपदी योगीराज तेली यांची निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.४ मार्च २४ सोमवार

येथील वनपरिक्षेत्रातील कास्ट्राईब वन कर्मचारी संघटनेची बैठक कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महासंघाचे जिल्हाध्यक्ष पुलकेशी केदार यांच्यासह जिल्हा सचिव ब्रह्मानंद तायडे,शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष बापू साळुंके,वन विभागाचे जिल्हाध्यक्ष विकास सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उनपदेव येथे नुकतीच पार पडली.

सदर बैठकीत पुलकेशी केदार,बापू साळुंके,विकास सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना संघटनेचे ध्येय, धोरणाबाबत विचार व्यक्त करून माहीती दिली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र तायडे यांनी वन विभागातील कर्मचारी यांना कर्तव्यावर कार्य करीत असतांना होणाऱ्या विविध समस्या व अडचणींबाबत प्रकाश टाकून त्या सोडवणे बाबत मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमात कास्ट्राईब दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.याप्रसंगी कास्ट्राईब वन विभागातील कर्मचारी राकेश निकुंभे यांची जिल्हा सचिवपदी तर यावल वनविभागात आपल्या प्रशासकीय सेवेतील कार्याचा वेगळा ठसा उमटविणारे योगीराज तेली यांची संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली व त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.सदर कार्यक्रम प्रसंगी जळगाव मनपाचे नंदकुमार गायकवाड,लोकेश बारेला,हेमलता बारेला,सुमित्रा पावरा,संजय बेलदार,दर्शन सोनवणे,संदीप पावरा यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित बारेला यांनी केले तर उपस्थितांचे आभार राकेश निकुंभे यांनी मानले.दरम्यान निवड करण्यात आलेल्या राकेश निकुंभे व योगीराज तेली यांचे स्वागत करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.