सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.५ मार्च २४ मंगळवार
सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथे वृद्ध दाम्पत्याच्या निर्घृण हत्येच छडा लावण्यास पोलिसांना यश आले असून हे हत्याकांड पोटच्या मुलानेच तेसुद्ध रेशनकार्ड न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.भीमराव गणपती कुंभार (वय ७०) आणि त्यांच्या पत्नी सुसाबाई ऊर्फ सुशीला कुंभार (वय ६५) यांची राहत्या घरात गेल्या २९ फेब्रुवारी रोजी रात्री हत्या झाली होती.
या गुन्ह्याचा तपास करतांना कुंभार यांचा विभक्त राहणारा मुलगा समाधान कुंभार (वय ४२) याच्या दिशेने संशयाची सुई सरकली व त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.समाधान हा आई-वडिलांकडे गेल्या दहा दिवसांपासून रेशनकार्ड मागत होता.दि.२९ फेब्रुवारी रोजी रात्री गावात शिवजयंती उत्सवाची मिरवणूक सुरू असतांना त्याने आई-वडिलांच्या घरी जाऊन रेशनकार्ड मागितले.आई सुशीला हिने रेशनकार्ड सापडत नसल्याचे सांगितले तेव्हा समाधान याने घर धुंडाळू लागला असता आईने विरोध केला व त्याचा राग मनात धरून समाधान याने आईचा गळा दाबून नंतर नायलॉनच्या दोरीने गळफास देऊन खून केला त्यानंतर वडिलांचाही खून केला असे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.एस.खणदळे यांनी सांगितले.दरम्यान समाधान कुंभार यास दि.९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.