Just another WordPress site

मोबाईल फोन बॅटरीचा स्फोट होऊन बालकाचा मृत्यू !!

याबाबत अधिक वृत्त असे की,भोकरदन शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जालना रोडवरील कुंभारी येथे गणेश दांडगे यांच्या तेराव्याचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी झाला.सदर कार्यक्रम आटोपून दि.४ मार्च सोमवार रोजी सायंकाळच्या सुमारास तायडे कुटुंब आपल्या मुळ गावी आमठाणा येथे परतणार होते मात्र चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर बोलत असतांना मोबाईलची खराब बॅटरी बालकाने कानाला लावली आणि त्याच क्षणी त्याचा स्फोट होऊन यात बालकाचे कानाला व हाताच्या बोटाला गंभीर मार लागला.दरम्यान भोकरदन येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात समर्थला दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले असे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे.सदरील बालकाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.