१२ कोटीची निधीच्या सौंदर्यीकरणातून भिमटेकडीचा होणार कायापालट
आमदार रवी राणा यांच्या हस्ते भूमिपूजन ; बौद्ध धम्म प्रचार समितीने मानले आभार
गोपाल शर्मा,पोलीस नायक
विदर्भ विभाग प्रमुख
दि.८ मार्च २४ शुक्रवार
आंबेडकरी जनतेचे तिर्थ क्षेत्र भिमटकेडीचा संपूर्ण कायापालट होणार असून आमदार रवी राणा यांनी आपल्या विकासात्मक निधीतून १२ कोटी रुपयांच्या सौंदर्यीकरण कामाचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले आहे.सदरहू आमदार रवी राणा यांनी दिलेल्या योगदानाबद्दल व कार्याबद्दल बौद्ध धम्म प्रचार समितीच्या वतीने आभार मानण्यात येत आहे.
आमदार रवी राणा यांच्या निधीतून भिमटेकडीच्या रुपात शहरावासियांना एक नविन सुंदर पर्यटन क्षेत्र लाभणार आहे कारण भिमटेकडी येथे राणा यांच्या प्रस्तावित विकास आरखडा अंतर्गत भव्य दिव्य रंगमंच,फाऊंटेन,प्लेवर ब्लॉक्स, भीमटेकडी ते यशोदा नगर रस्त्यावर पथदिवे इत्यादी कामे होणार आहे.या संपूर्ण सौंदर्यीकरण व विकास कामाचे नुकतेच रवी राणा यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.यावेळी बौद्ध धम्म प्रचार समितीचे संस्थापक घनश्याम आकोडे,समितीचे पदाधिकारी भारत शहारे,किशोर तायडे,इंजि.गोपाल इंगळे,रमेशचंद्र रंगारी,प्रसन्न गायकवाड,आनंद तायडे,प्रा.भगवान गोसावी,उत्तमराव शिंगणापूरे,अॅड.पी.टी.खडसे,डॉ.कमल राऊत,डॉ.प्रेमानंद तिडके,कुसुमताई वानखडे,अध्यक्ष सचिव व समस्त कार्यकारी मंडळ महिला समिती,युवा स्वाभिमान चे महानगर प्रमुख नितीन बोरेकर,मिलिंद कहोले,गौतम हिरे,इंजिनिअर नितीन बोबडे,चैतन्य काळे,विवेक देशमुख,प्रवीण आकोडे व असंख्य नागरिक उपस्थित होते.प्रसंगी भिमटेकडीचे सर्व विश्वस्त,बौद्ध धम्म प्रचार समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी आमदार रवी राणा यांचे आभार व्यक्त केले आहे.मागील कित्येक वर्षापासून भिमटेकडीचा विकास प्रलंबित होता.आमदार रवी राणा यांनी लक्ष दिले आणि आता आंबेडकरी जनतेचे तिर्थ क्षेत्र विकसित केल्या जाणार आहे.