मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.११ मार्च २४ सोमवार
शिवसेना ठाकरे गटाचे नेते रविंद्र वायकर यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आणि भगवा झेंडा हाती घेतला ज्यानंतर विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.विकासाचा आमचा मार्ग रविंद्र वायकर यांना पटल्याने ते आमच्याबरोबर आले आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे तर दुसरीकडे संजय राऊत यांनी याबाबत मला काय विचारता ? देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींना विचारा म्हटले आहे.रविंद्र वायकर शिवसेनेत गेलेत त्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी,देवेंद्र फडणवीस यांच काय मत आहे ? मुलुंडचा पोपटलाल (किरिट सोमय्या) आतमध्ये कडी लावून बसला आहे.वायकरांना तो तुरुंगात टाकणार होता.सातत्याने त्याने रविंद्र वायकरवर आरोप केले आणि ईडीकडे तक्रारी केल्या.आता वायकरांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर त्याचे मत घ्या.वायकर आता वॉशिंगमध्ये गेले आणि तुमच्याकडे आले.आमच्याकडे असताना आरोप करायचे,गुन्हे दाखल करायचे,कुटुंबाला त्रास द्यायचा त्यामुळे भीतीपोटी एखादा माणूस तिकडे गेला तो पवित्र होतो,स्वच्छ होतो व वायकर यांचेही तसेच होते.लढाईच्या वेळेला पळून जाणाऱ्यांची नोंद इतिहासात होत नाही.या सगळ्यात नाचक्की झाली आहे ती भाजपाची आणि कथित मित्र पक्षांची.आता रविंद्र वायकरांवर झालेल्या आरोपांचे काय ? ज्याने वायकरांचा छळ केला तो मुलुंडचा पोपटला कुठे आहे ? आता त्याने बोलावे.त्याची प्रतिक्रिया घ्या असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
रविंद्र वायकरांच्या ५०० कोटींच्या प्रॉपर्टीवर जो दावा सांगितला होता ते काय वाटून घेतले का ? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.अत्यंत तणावात,दबावात त्यांनी हा निर्णय घेतला.ईडी,सीबीआयच्या धमक्या त्यांना देण्यात आल्याने ते त्या गटात गेले आहेत.पश्चिम बंगालमध्येही तेच झाले रॉय जे तिकडे होते ते भाजपात आले ते पवित्र झाले.दिल्लीचे बुट स्वच्छ करण्याचे काम एकनाथ शिंदे मागच्या दोन वर्षांपासून करत आहेत.ओरिजनल शिवसेनेने कधीही दिल्लीत जाऊन जागा वाटपाची चर्चा केली नाही.आता यांना उठसूट दिल्लीला जावे लागत आहे.निवडणूक आयुक्तांनी राजीनामा का दिला ते माहीत नाही.त्यामागे काय कारण आहे भाजपाने सांगावे.आता त्या जागी भाजपाची गुलामी करणारा माणूस तिथे बसवला जाईल असाही टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.