“शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
डोंगर कठोरा येथील गावकऱ्यांच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ मार्च २४ बुधवार
जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या डोंगर कठोरा या लहानशा खेडेगावातील सर्व लहान थोरांचे परीचीत असलेले आदरणिय सिताराम सूका तायडे (सिताराम मास्तर) यांचे चिरंजीव व सध्या डोंबिवली मुंबई येथील मुंबई प्रधीकरणात सीव्हील इंजीनीयर म्हणुन कार्यरत राहून सेवानिवृत्त झालेले तसेच फिनॅामीनाल म्युजीक ग्रुपतर्फे संपूर्ण भारतात घेण्यात आलेल्या गाण्याची प्रतीयोगीता स्पर्धेत विश्वविजेते पद पटकावणारे डिगंबर सिताराम तायडे यांची पत्नी शकुंतला डिगंबर तायडे यांना नुकतेच “महाराष्ट्राची हिरकणी” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.परिणामी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्याशा अशा डोंगर कठोरा खेडेगावातील गावकऱ्यांच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे.शकुंतला तायडे यांनी समाजीक,शैक्षणिक क्रीडा क्षेत्रासोबत क्रीकेट,कॅरम,मॅरेथॅान अशा विविध क्षेत्रात निपुण कामगिरी केल्याबद्दल त्यांना नुकत्याच एका समारंभात “महाराष्ट्राची हिरकणी” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले परिणामी त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
सदरहू महाराष्ट्राची हिरकणी पुरस्कार सोहळा नुकताच मराठी ग्रंथ संग्रहालय दादर येथे संपन्न झाला.प्रसंगी डोंगर कठोरा येथील सीताराम मास्तर यांचे सुपुत्र डिगंबर तायडे व सून शकुंतला डिगंबर तायडे यांना सामाजिक,व्यवसायिक,संगीत व क्रीडाक्षेत्रासाठी मुंबईच्या माजी महापौर श्रीमती स्नेहल अंबेकर यांचे हस्ते महाराष्ट्राची हिरकणी हा पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.महाराष्ट्राची हिरकणी हा कार्यक्रम सुनीर्मल फाउंडेशन मुंबईच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्रात विविध क्षेत्रात काम करण्याऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्याचे आयोजीत केले होते. तद्नुसार सदर क्षेत्रात शैक्षणिक,साहित्यिक,पत्रकारिता,वैद्यकीय,उद्योग,शेती,बचतगट,संस्था आणि संघटना,सामाजिक क्षेत्र,व्यावसायिक,समाज कल्याण,क्रीडा आणि इत्तर क्षेत्रात ठसा उमठविणाऱ्या महिलांचा प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण समारंभ साजरा करण्यात आला.सदर पुरस्कार हा डोंगर कठोरा येथील सर्व महीलांचा सन्मान असल्याची भावना महाराष्ट्राची हिरकणी पुरस्कार विजेत्या शकुंतला डिगंबर तायडे यांनी व्यक्त केली आहे.सदर पुरस्कार वितरण समारोपाला राही भिडे (जेष्ठ पत्रकार),धनश्री धनंजय पालांडे (संपादक दैनिक रत्नभूमी /दैनिक भैरव टाइम्स),
श्रीमती स्नेहल आंबेकर (माजी महापौर),राजेंद्र घरत (उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर),अमृता उत्तरवार (चित्रपट-मालिका अभिनेत्री) यांच्यासह सुनिर्मल फाउंडेशन मुंबई चे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
आपली बातमी वाचून आनंद झाला , आपण लहन मोठ्या कामांची दखल घेवून
व्रुत्त पत्रकात सवीस्तर व सत्त्य खबर बात देवून सर्व क्षेत्रातील वीवीध पैलुचे समाचार व्यक्ती व्यक्ती परीयंत पोचवतात. ही जन सामान्यातील जाग्रुती जील्हा काय राज्य तर देशा देशाच्य घडवलीस सहाय्यभूत होते.
आपल्या पत्रकारीता स आमच्या मनस्वी शुभेच्छा.
दिगंबर तायडे.
धन्यवाद सर जी