मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- ऑगस्ट महिन्यात रिलायन्स रुग्णालयात फोन करून उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.पोलिस तपासात संबंधित धमकी एका मानसिक आजार असलेल्या व्यक्तीने केल्याचे समोर आले होते.आता दीड महिन्यानंतर पुन्हा एकदा असाच कॉल आला आहे.एचएन रिलायन्स रुग्णालयात आज ५ ऑगस्ट रोजी फोन करून रुग्णालय बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती.त्याच बरोबर अंबानी कुटुंबातील व्यक्तींची हत्या करण्याची धमकी फोनवरून देण्यात आली.या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याच बरोबर रुग्णालयाची तपासणी करण्यात येत आहे तसेच रुग्णालयाची आणि अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.या प्रकरणी धमकी देणाऱ्यास लवकरात लवकर अटक केली जाईल असे क्राइम ब्रॅन्चचे डीसीपी नीलोत्पल यांनी म्हटले आहे.
याआधी १५ ऑगस्ट रोजी रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या फोन नंबरवर एका व्यक्तीने ८ वेळा धमकी देणारा फोन केला होता.फोन करणाऱ्या व्यक्तीने अंबानी कुटुंबाला ३ तासात संपवण्याची धमकी दिली होती.त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने याची माहिती डीबी मार्ग पोलिसांनी दिली होती.पोलिसांनी तातडीने कारवाई करत दहिसर येथून एका व्यक्तीला अटक केली होती.पोलिस चौकशीत संबंधित व्यक्ती मनोरग्ण असल्याचे आणि त्याने याआधी अशा प्रकारचे फोन केल्याचे समोर आले होते.आता अशात शिवसेनेचे दोन मेळावे होत असतांना पुन्हा आज एचएन रिलायन्स रुग्णालयात आज ५ ऑगस्ट रोजी फोन करून रुग्णालय बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती.त्याच बरोबर अंबानी कुटुंबातील व्यक्तींची हत्या करण्याची धमकी फोनवरून देण्यात आली आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ झाली आहे.