डॉ. सतीश भदाणे,पोळीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधि) :-
दि.१४ मार्च २४ गुरुवार
तालुक्यातील मेलाने गावात वन पट्ट्यातील शेतीमध्ये मक्याची शेती करीत असतांना त्यात आंतरपीक म्हणून गांजा लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.सदरहू स्थानिक गुन्हे शाखा जळगाव आणि चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी संयुक्तरित्या या गावी जाऊन शेतात पाहणी केल्यावर मक्याच्या पिकामध्ये गांजा लागवड केलेली आढळून आले.याबाबत ४४ लाखांच्या मुद्देमालासह एकाला अटक करण्यात आली असल्याचे पोलीस सूत्रांकडून कळविण्यात आले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,तालुक्यातील मेलाने गावात वन पट्ट्यातील शेतीमध्ये मक्याची शेती करीत असतांना त्यात आंतरपीक म्हणून गांजा लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्या नुसार स्थानिक गुन्हे शाखा जळगाव आणि चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन कर्मचारी यांच्या पथकाने संयुक्तरित्या सदर शेतात जाऊन पाहणी केली असता या मक्याच्या पिकामध्ये गांजा लागवड केलेली आढळून आले.दरम्यान दीड एकर क्षेत्रामधील गांजा उपटून एकूण ९८० किलो असा ४४ लाख १० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून त्यासोबत शेती करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.पुढील तपास चालू आहे अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांनी दिली आहे.सदरील गांजाची शेती करणाऱ्याबद्दल जर कोणी माहिती दिली तर त्याठिकाणी नक्की कारवाई करण्यात येईल अशी सूचना देखील पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांनी यावेळी दिली आहे.दरम्यान चोपडा तालुक्यात ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत सहा महिन्यातील गांजा शेती उध्वस्त करण्याची ही दुसरी कारवाई आहे.पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर या करीत आहेत.