बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ मार्च २४ शुक्रवार
काहीही झाले तरीही मी माझे इमान विकणार नाही.आपल्यातल्या काही हरा### अवलादी फोडल्या.आज मराठ्यांच्या अवलादी नसल्यासारखे काही लोक वागत आहेत. काही लाखांसाठी फुटून हे लोक विरोधात बोलत आहे.मी चुकीची बाजू लावून धरलेली नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी काल बीडच्या सभेत म्हटले आहे.काल मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये सभा घेतली.त्या सभेत त्यांनी फुटलेल्या लोकांवर टीका केली तसेच देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी इशारा दिला आहे.प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेतली त्यात ते म्हणाले की,मला गुप्त माहिती मिळाली आहे की देवेंद्र फडणवीसांनी डाव रचला आहे.मुंबईला जसा मोर्चा काढला होता त्यावेळी तेरा ट्रॅप रचले गेले होते.आता या आठवड्यातही असेच काही सुरु आहे.बदनाम करण्यासाठी विरोधात बोलायला लावायचे,केसेस करायच्या,सामान्य मराठा पोरांवर केसेस करायच्या हे चालले आहे.ऐकले नाही तर एसआयटी नेमा आणि तुरुंगात टाका हे चालले आहे असा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे.कालच्या मी सभेत जाहीरपणे सांगतो जेलमध्ये सडलो तरीही चालेल पण समाजाशी गद्दारी करणार नाही.या जगात चांगले काम करणे अवघड झाले आहे.कायद्याच्या चौकटीत राहून काम करणे, लोकशाही मार्गाने काम करणेही जड झाले आहे.इंग्रज आणि निजाम यांच्या काळातही असे होत नव्हते.देवेंद्र फडणवीसांनी मागच्या २० ते २२ दिवसांपासून मराठा समाज वेठीला धरला आहे.काहीही कारण नसताना त्रास देणे सुरु आहे.मात्र बाबा तुला माहीत नाही,देवेंद्र फडणवीस मला अटक करायला हिंमत लागते.सहा कोटी मराठ्यांना ओलांडून माझ्यापर्यंत यायचे आहे.राज्यात आम्हाला घर आहेत तशी तुमचीही घरे आहेत हे विसरु नका असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला आहे.
मला मिळालेली माहिती मी तुम्हाला सांगतो आहे.माझ्याविषयी व्हिडीओ तयार करायचे,भाजपाच्या लोकांनी ते व्हायरल करुन लोकांपर्यंत पोहचवायचे.मला बदनाम करायचे म्हणजे मी मराठ्यांपासून लांब गेलो पाहिजे असा कट रचण्यात आला आहे.प्रकाश आंबेडकर यांनी असेही सांगितले आहे मनोज जरांगेंनी घाबरु नये.
देवेंद्र फडणवीसांना जाहीर सांगतो आहे,तुम्हाला जे करायचे आहे ते तुम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमांतून करणार आहात पण मला जे करायचे ते पण मी करणार आहे. कुठलेही व्हिडीओ आणा, कसलेही रेकॉर्डिंग आणा मी आरक्षण घेणार म्हणजे घेणारच.वेळ पडली तर समाजासाठी वेगळे आंदोलन करेन.मला कितीही बदनाम करा, समाजापासून एक इंचही मागे हटणार नाही या भूमिकेवर मी ठाम आहे.मी मेलो तरीही तुमच्या बाजूने येणार नाही.देवेंद्र फडणवीस यांची वृत्ती नीच आहे.आपल्या विरोधात इमानदार पोरगा लढतोय याचे तुम्ही कौतुक करायला पाहिजे होते तर तुम्ही खरे राजकारणी.मात्र फडणवीस हे बेगडी राजकारणी आहेत.मी वडवणीतून तुम्हाला आव्हान देतो आहे.तुम्ही मला बदनाम करा,कट रचा मराठा समाजापासून तोडण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या ४८ पैकी एकही खासदार निवडून येऊ देणार नाही.माझ्याविरोधातले व्हिडीओ व्हायरल केले तर याचा सुपडा साफ करायचा.देवेंद्र फडवणीस यांच्यासारखा आणि खुनशी मंत्री मी पाहिला नाही.त्यांच्याकडून बोलणारे सात ते आठ आहेत.सत्ता येत असते जात असते,नका त्रास देऊ.माझी SIT चौकशी सुरू आहे.तुमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत तर होऊ द्या.मी सागर बंगल्यावर जाऊन दहा लाख घेऊन जातो.मराठ्यांनी व्यसनापासून लांब रहा,आपली प्रगती कोणीही रोकू शकत नाही.जामनेरचे टंबरेल गिरीश महाजन म्हणतो माझे खूप लाड केले अरे तूच आमचा चहा प्यायला आणि पोहे खाल्ले असे मनोज जरांगे म्हणाले.