निवडणूक आयुक्त सेषन होते तेव्हा जनतेला विश्वास होता की या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा घोटाळा,चोऱ्या माऱ्या होणार नाहीत पण आज लोक साशंक आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या असल्या तरी आपण स्वतंत्र आहोत,निष्पक्ष आहोत.जग आपल्या लोकशाहीकडे एका विशिष्ट भूमिकेतून पाहत आहे त्यामुळे या देशात लोकशाही राहणार की नाही हे या निवडणुका ठरवतील असेही राऊत म्हणाले.दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याआधी आयुक्त राजीव कुमार यांनी एक तास निवडणुकीच्या कार्यपद्धतीविषयी सखोल माहिती दिली.यावरून संजय राऊत म्हणाले,निवडणुकीत पारदर्शकता राहणार याची गॅरंटी मोदी देणार का ? मोदी अनेक गॅरंटी देशाला देतात पण निवडणुका पारदर्शकपद्धतीने होणार याची गॅरंटी देऊ शकतात का ? मला वाटत नाही कारण मोदी आणि निवडणूक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे त्यांचे निर्णय आणि त्यांच्या भूमिकावरून स्पष्ट होत आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.मतदारांचा ईव्हीएमवर विश्वास नाही तरीही आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत.मोदींनी गॅरंटी द्यावी.निवडणुका पारदर्शक करणार आहेत की निवडणूक आयोगाला तपास यंत्रणांप्रमाणे त्यांच्या हातातील बाहुले म्हणून वागवणार आहेत.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारांची यादी तयार आहे.जागा वाटप जवळजवळ संपले आहे.शेवटची चर्चा आज-उद्या होईल.राहुल गांधींसह काँग्रेसचे सर्व नेते मुंबईत आहेत असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.