दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-देशातील अनेक राज्यांमध्ये दसऱ्याच्या दिवशी हलका पाऊस झाला.खरे तर चीन समुद्रातील नोरू वादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून वादळी वारे वाहत आहेत.त्यामुळे आर्द्रता वाढल्याने पाऊस पडत आहे हा पाऊस ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.हवामान खात्यानुसार पुढील काही दिवस उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात पाऊस पडेल.उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.७ व ८ ऑक्टोबर २२ रोजी उत्तराखंडमधील कुमाऊ आणि गढवाल भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यामुळे उत्तर प्रदेशात पुढील दोन ते तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्याचबरोबर मध्य प्रदेश, छत्तीसगड,ओडिसा,आंध्र प्रदेशमध्ये काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
याबाबत हवामान खात्याने देशातील २० राज्यांमध्ये पावसाबाबत यलो अलर्ट जारी केला आहे.यात उत्तर प्रदेश,बिहार,मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल,ओडिशा,छत्तीसगड,महाराष्ट्र,तेलंगणा,पुद्दुचेरी,आंध्र प्रदेश,तामिळनाडू,केरळ,सिक्कीम,आसाम,मेघालय,नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.