अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी टीका केली असून त्या म्हणाल्या,दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या निमित्ताने अशा प्रकारे टार्गेट करणे चुकीचे आणि घटनाबाह्य आहे अशा प्रकारे राजकारणाची पातळी घसरणे ना पंतप्रधानांना शोभते ना त्यांच्या सरकारला.निवडणुकीच्या लढाईत तुमच्या टीकाकारांशी लढा,त्यांचा धैर्याने सामना करा आणि अर्थातच त्यांच्या धोरणांवर आणि कार्यशैलीवर हल्ला करा ही लोकशाही आहे परंतु अशाप्रकारे देशाच्या सर्व संस्थांच्या शक्तीचा वापर करून स्वत:चे राजकीय उद्दिष्ट पूर्ण करणे आणि दबाव आणून त्यांना कमकुवत करणे हे लोकशाहीच्या प्रत्येक तत्त्वाच्या विरुद्ध आहे.तसेच देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली आहेत,सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते ईडी,सीबीआय,आयटीच्या दबावाखाली आहेत,एका मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकण्यात आले आहे,आता दुसरे मुख्यमंत्री देखील तुरुंगात आहेत असे लाजिरवाणे दृश्य भारताच्या स्वतंत्र इतिहासात प्रथमच पाहायला मिळत आहे असेही प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.