Just another WordPress site

मराठा समाजातर्फे रावेर लोकसभेकरीता चहार्डीच्या कोमलताई पाटील यांच्या नावाची चर्चा

कोमलताई पाटील यांना बी.आर.पक्षाचा देखिल पाठिंबा

डॉ सतीश भदाणे,पोलीस नायक

चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-

दि.२७ मार्च २४ बुधवार

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली व या बैठकीसाठी राज्यभरातून मराठा समाज अंतरवाली सराटीमध्ये मोठा संखेने उपस्थित राहिला.या बैठकीत बोलतांना लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजला महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे.

यात लवकरच येत्या ३० तारखेपर्यंत गाव बैठका घेऊन आपला अहवाल कळवावा व त्यावर लवकरच पुढील दिशा ठरवू असे देखील ते म्हणाले.या अनुषंगाने रावेर लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या कोमलताई बापूराव पाटील यांनी आपण रावेर लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे मनोज जरांगे पाटील यांना सांगितले.यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असे देखील मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले असून रावेर मधील जागा ही बीजेपीच्या विरुद्ध आपण अपक्ष लढणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी भारत राष्ट्र समिती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नाना बच्छाव,उत्तर महाराष्ट्र सहसमन्वयक संदीप खुटे,चोपडा विधानसभा प्रमुख समाधान बाविस्कर,योगेश पाटील,नाटकर हर्षल पाटील,बापूराव पाटील,अनिता बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.