Just another WordPress site

भाजपा राष्ट्रीय पक्ष आहे कि चोरबाजार? उद्धव ठाकरेंची घणाघाती टिका

कार्यक्रमाच्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले मन मोकळे

मुंबई :- भाजपा हा राजकीय पक्ष आहे की चोरबाजार आहे अशी खरमरीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच केली आहे.दि.२४ रोजी षण्मुखानंद सभागृहात आयोजित मुंबई इलेक्ट्रिक वर्कर युनियनच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.ठाकरे  यांनी यावेळी भाजपा व शिंदे गटावर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की,भाजपा हा राष्ट्रीय पक्ष म्हणुन घेत असला तरी या राष्ट्रीय पक्षाला सर्वच काही कमी पडू लागले आहे.सध्या भाजपा कडून दुसऱ्या पक्षाचे आमदार,खासदार व बडे नेते चोरण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे.परिणामी भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे कि चोरबाजार असा प्रश्न पडायला लागला आहे.असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढला.

तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुंबई इलेक्ट्रिक वर्कर युनियन पदाधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर दिलखुलास चर्चा करून मन मोकळे केले.

Leave A Reply

Your email address will not be published.