Just another WordPress site

यावल ग्रामीण रूग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उद्धटपणाच्या वागणुकीमुळे रूग्णांमध्ये नाराजी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.३० मार्च २४ शनिवार

येथील ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने व तात्पूरत्या स्वरूपात आलटून पालटून येणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे आरोग्य सेवेचे तिन तेरा वाजले असुन यातच एका महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या रुग्णांशी उद्धटपणाच्या वागणुकीमुळे आरोग्य प्रशासनाच्या दुर्लक्षीत कारभाराबद्दल रुग्णांमध्ये व त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.परिणामी आरोग्य प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी तूर्त लक्ष देऊन रूग्णांशी निगडीत या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

यावल शहर हे आदिवासी क्षेत्रातील तालुक्यातील प्रमुख शहर म्हणुन ओळखले जाते.परिणामी याठीकाणी असलेल्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी गोरगरीब,आदिवासी व सर्वच थरातील रूग्णांची मोठी गर्दी होत असते व असे असतांना येथील ग्रामीण रुग्णालयाला मागील दोन वर्षापासुन कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी पदाची चार पदे ही रिक्त असल्याने तातपुरत्या स्वरूपात वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांकडून रुग्णांचे अर्धवट उपचार होत आहे आहेत.दरम्यान भुसावळ येथून ये-जा करणाऱ्या एका महिला डॉक्टर या मुख्यालयी राहणे बंधनकारक असतांना या शासनाच्या निर्णयाला न जुमानता संबंधित डॉक्टर या भुसावळ येथून ये-जा करून रुग्णांशी अत्यंत निंदनीय व उद्धटपणाची वागणुक देत असल्याने रुग्णांमध्ये व त्यांच्या नातेवाईकांमध्ये सदरील डॉक्टरांच्या कार्यपध्दीतीबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान लोकप्रतिनिधी यांनी प्रसिध्दी लाटण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात वारंवार आरोग्य शिबीर घेण्याऐवजी यावल ग्रामीण रूग्णालयात मागील दोन वर्षापासुन रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरल्यास अशा प्रकारे शिबीरांचे प्रसिद्धीसाठी गोंधळ घालण्याची गरज पडणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया रूग्णांमध्ये व त्यांच्या नातेवाईकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.सदरहू आरोग्य प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी तूर्त लक्ष देऊन रूग्णांशी निगडीत या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.