यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३० मार्च २४ शनिवार
यावल भुसावळ मार्गावरील निमगाव ते राजोरा फाटा परिसरात नागरीकांना रात्री बिबट्याचे दर्शन झाले असून बिबट्याच्या या मुक्तसंचारामुळे परिसरात घबराटीचे वातावरण असतांना याबाबत दक्षता घेण्याकामी नागपुर वन विभागाच्या पथकाला बिबट्याला पकडण्याकामी पाचारण करण्यात आले असुन बिबट्याच्या शोधकामाला हे पथक मदत करणार आहे.दरम्यान बिबटयाच्या या वावरामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसले असुन ग्रामस्थांनी एकटे शेतीकामाला जावु नये तसेच नाले,पाणवटे,ठंडावाच्या ठीकाणी जाण्यास टाळावे त्याचबरोबर ज्या ठिकाणी बिबट्याचे ठसे आढळले त्याठिकाणी नागरीकांनी जाण्यास टाळावे तसेच अचानकपणे बिबट्या समोर आल्यास त्याकडे पाठ न करता हळूहळु मागे सरकुन सुरक्षीत अंतर ठेवावे,बिबट्या दिसल्यास त्याचा पाठलाग करू नये असे आवाहन यावल पुर्व वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फंटागरे यांनी केले आहे.दरम्यान राजोरा गावात नागरीकांनी विशेष दक्षता घेणेकामी बिबट्या जनजागृती व शोध पथकाचे संचालक वाईल्ड कॉन्सरवर्सन फाउंडेशन नागपुरचे संचालक अजिंक्य भांबुरकर व के.एल.धनगर,तुकाराम लवटे,जिवन नागरगोजे,बि.बि. गायकवाड,नयनसिंग बारेला,गणेश चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक नुकतीच घेण्यात आली.
या संदर्भात वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की,यावल ते भुसावळ मार्गावरील असलेल्या निमगावपासुन राजोरा फाटा परिसरात नुकतेच रात्रीच्या सुमारास निमगावचे काही तरूण हे शौचालयास गेले असता त्यांना बिबट्या दिसुन आला.बिबटया दिसताच शौचास गेलेल्या तरुणांनी पळ काढला तसेच काही वाहनधारकांना देखील शेत आवारात बिबट्याचे दर्शन झाल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगीतले आहे.याबाबतची माहिती मिळाल्यावर यावल पुर्व वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फंटागरे यांनी बिबट्या असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असुन त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली तात्काळ दक्षता घेत बिबट्याच्या शोधकार्यासाठी लागणारे पथक कार्यरत आहे.मागील काही तासापासुन बिबट्याचा वावर या परिसरात असल्याचे बोलले जात असून यावल हतनुर पाटचारी परिसर,राजोरा,सांगवी,बोरावल,टाकरखेडा,निमगाव व आदी ठीकाणाच्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी व शेतीकामाला एकटे जावु नये असे आवाहन यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेस हडपे व वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगेर यांनी केले आहे.