जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३० मार्च २४ शनिवार
नुकत्याच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी उमेदवारास निवडून येण्याकरिता पोषक असे वातावरण असल्याने रावेर लोकसभा मतदार संघातून मविआचा उमेदवार हा कुठल्याही परिस्थितीत निवडून आणणारच असा निर्धार काँग्रेस निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष जलील पटेल यांनी नुकताच व्यक्त केला आहे.
देशात लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणुक हि भारतीय राज्यघटना तसेच लोकशाही वाचवण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.त्याचबरोबर वाढलेली महागाई,बेरोजगारी,महीला अत्याचार,शेतकरी आत्महत्या,इलेक्ट्रॉरोल बाँडचा सर्वात मोठा भ्रष्टचार व घोटाळा, सीबीआय व इडी यांचा दुरुपयोग अशा अनेक गोष्टींचा वापर भाजप नेते आणि पंतप्रधान यांनी गेल्या १० वर्षात करून विरोधी पक्ष संपवायची खेळी केली आहे व त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात इंडिया आघाडी व राज्यात महाविकास आघाडीला बहुमत प्राप्त होण्यास पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे.परिणामी जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघातून आघाडी जो उमेदवार देईल त्याला महाविकास आघाडी नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर आणि मतदारांची साथ आणि आशीर्वाद यांच्या जोरावर मोठ्या मताधिक्याने निवडून आणू असा निर्धार कोरपावलीचे माजी सरपंच तथा काँग्रेस निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांनी “पोलीस नायक” प्रतिनिधीजवळ बोलतांना व्यक्त केला आहे.