Just another WordPress site

यावल-चोपडा महामार्गावर रिक्शा व दुचाकीच्या भिषण अपघात पती-पत्नी गंभीर जखमी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि,२ एप्रिल २४ मंगळवार

यावल-चोपडा महामार्गावरील वढोदे गावाजवळ रिक्शा आणी मोटरसायकलचा भिषण अपघात होवुन यात चार जण जखमी झाल्याची घटना नुकतीच समोर आली असुन यातील दोघ पती-पत्नीची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त मिळाले आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की,तालुक्यातील गिरडगाव येथील रहिवाशी कैलास विक्रम पाटील वय-५२ वर्ष व त्यांच्या पत्नी वंदना कैलास पाटील वय-४८ वर्ष (आशा वर्कर) हे यावल येथून आपले शासकीय कामकाज आटोपुन आपल्या घरी येणासाठी निघाले असता त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एमएच १९ बि सि २१०० या दुचाकी वाहनाने किनगावकडून येणाऱ्या रिक्शा क्रमांक एमएच १९ सि डब्ल्यु ५१२१ या वाहनांचा वडोदे गावाजवळ विलास जैन यांच्या न्यू ईरा या कंपनीजवळ समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात कैलास पाटील व त्यांच्या पत्नी वंदना पाटील यांना गंभीर दुखापत झाली असुन या अपघातात रिक्शाचालक व त्याची पत्नी देखील किरकोळ जख्मी झाले आहेत.दरम्यान अपघाताची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नरेन्द्र बागुले व त्यांच्या सहकार्यानी धाव घेत तात्काळ जखमींना यावलच्या ग्रामीण रूग्णालयात प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे.पोलीसांनी अपघातातील दोघे वाहन पोलीस ठाण्यात जमा केली असुन या अपघातात जखमी यांना जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले असल्याने पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली नसल्याबाबत सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.