Just another WordPress site

निंबादेवी जंगलातील अवैद्य वृक्षतोड माफियांविरोधात वन विभागाची धडक कार्यवाही

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२ एप्रिल २४ मंगळवार

तालुक्यात वृक्षतोड माफियाच्या विरूद्ध वनविभागाच्या कार्यवाहीचे धाडसत्र सुरूच असुन निंबादेवी जंगलातील अवैद्य वृक्षतोड माफियांविरोधात यावल पश्चिम वन विभागाच्या वतीने धडक कार्यवाही राबविण्यात आली.दरम्यान निंबादेवी वनक्षेत्रातील जंगलात यावल पश्चिम वन विभागाचे सामूहिक पथक हे गस्त करीत असतांना नाल्यात अवैध्यरित्या तोड केलेला खैर जातीच्या वृक्षाची तोड आढळून आली.याबाबत सदरील माल जप्त करण्यात आला असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या संदर्भात वनविभागाच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,पश्चिम क्षेत्राच्या वन विभागाचे पथक हे सामुहिकरित्या गस्तीवर असतांना त्यांना काल दि.१ एप्रिल रोजी निंबादेवी जंगल परिसरात अवैद्यरित्या तोड केलेले खैर जातीचे वृक्षाची तोड करून टाकलेले लाकुड बेवारस अवस्थेत आढळून आले.यावेळी वन विभागाच्या कर्मचारी यांनी आजूबाजूस पाहणी केली असता त्या ठीकाणी मात्र आरोपी मिळून आला नाही. सदरील मुद्देमाल मोजमाप केले असता खैर जातीचे असुन त्याची संख्या नग ५१ घन मिटर व एकुण किंमत २५५८४ इतकी आहे.दरम्यान वनरक्षक निंबादेवी यांनी प्र.रि.क्र.४/२०२४ दि.१/४/२४ जारी केला असून सदरील मुद्देमाल खाजगी वाहनाने वाहतूक करून मुख्य् विक्री केंद्र यावल येथे ताबा पावतीने जमा करण्यात आला आहे.सदर गुन्हे प्रकणावर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६/१/अ,फ़ अन्वये अज्ञात व्यक्ति विरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.सदरची कार्यवाहीत वनक्षेत्र यावल पश्चीम क्षेत्राच्या पथकात सहभाग घेतला.सदर कार्यवाही ही श्रीमती निनु सोमराज वनसंरक्षक धुळे प्रादेशीक,जमीर शेख,उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव,राजेन्द्र सादगिर विभागीय वनअधिकारी (दक्षता) धुळे,प्रथमेश हाडपे सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक व कॅम्प यावल,पश्चीम वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल यावल सुनिल भिलावे यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल विजय बोराडे,विपुल पाटील,वनरक्षक अक्षय रोकडे,हनुमंत सोनवणे,सुधीर पटणे,चेतन शेलार,अशोक राठोड व रोपवन संरक्षण मजूर, फायर वॉचर सहभागी होते.तद्नुसार वनक्षेत्रपाल यावल पश्चीम(प्रा.) यावल वनविभाग जळगाव यांजकडून जनतेस आवाहन करण्यात येते की, वन व वन्यजीव तसेच लाकूड वाहतूकसंबधित कुठला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री १९२६या क्रमांकावर संपर्क करावे असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.