Just another WordPress site

आहिरवाडी येथे वन विभागाच्या धडक कार्यवाहीत ९५ किलो सलई डिंक व मोटरसायकल जप्त

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.४ एप्रिल २४ गुरुवार

यावल वनविभागाचे उप वनसंरक्षक व सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर(प्रादेशिक) यांच्या संयुक्त कार्यवाहीत अवैधरित्या दुचाकी वाहनाने डिंक वाहतुक करतांना ९५ किलो सलई डिंक व मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.

याबाबत वनविभागाच्या सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की,दि.३ एप्रील रोजी वन विभागास मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारावर परिमंडळ अहिरवाडी मधील नियतक्षेत्र पाडले मधील कंम्पार्डमेंट क्रमांक ०१/०३ मध्ये गस्त करीत असतांना हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स एक मोटार सायकलव्दारे अवैधरित्या सलई डिंक वाहतूक करतांना मिळून आली.सदर मोटारसायकल वर साधारण ९५ किलो सलई डिंक मिळून आला सदर माल जप्त करण्यात आला असून सदरील आरोपी हा गाडी व गाडीवरील सलई डिंक माल फेकून अंधाराचा फायदा घेत पसार झाला.प्रसंगी वन कर्मचाऱ्यांनी सदरील इसमाचा पाठलाग केला असता तो मिळून आला नाही.तरी सदरील वन गुन्हा हा वनरक्षक पाडले खु यांच्या कडील प्र.रि. क्र.०२/२०२४ दि.०३/०४/२९२४ नोंदविला असून सलई डिंक हा ९५ किलो असून त्याची किंमत १०४५० रुपये इतकी आहे तसेच मोटर सायकलची बाजारभाव अंदाजीत रक्कम ३६००० हजार रुपये असे एकूण रक्कम ४६४५० रुपये इतकी आहे.सदरील कार्यवाही ही यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख,सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली अजय नारायण बावणे वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर,राजेंद्र सरदार वनपाल अहिवाडी,वनरक्षक सुपडू सपकळे,वाहन चालक विनोद पाटील  करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.