Just another WordPress site

वनविभागाच्या धडक कार्यवाहीत २ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.४ एप्रिल २४ गुरुवार

येथील वनसंरक्षक यावल विभाग व सहाय्यक वनसंरक्षक यांच्या पथकाने केलेल्या कार्यवाहीत सुमारे दोन लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची कार्यवाही नुकतीच करण्यात आली आहे.वनविभागाच्या या सततच्या कार्यवाही मुळे अवैद्य वृक्षतोड करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

याबाबत वनविभागाच्या सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की,यावल वनविभागाचे वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त बातमीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर व आगार रक्षक रावेर (अति का) यांच्यासह मौजे विवरे ते वडगाव रस्त्याने गस्त करीत असतांना मौजे विवरे गावाच्या बाहेर ट्रॅक्टर क्रमांक एमएच १९ सि ८८८० या वाहनाने विना परवाना जळाऊ लाकडे वाहतूक करीत असतांना मिळून आले.दरम्यान जप्त करण्यात आलेला मुद्देमाल निम जळाऊ २.००० घन मिटर व भोकर जळाऊ ४ .५०० घन मिटर असे एकूण ६ .५०० घन मिटर तसेच किंमत ९१०० रुपये असून ट्रक्टर क्रमांक एमएच १९ सि ८८८० ची बाजारभाव अंदाजीत रक्कम २३०००० एकूण रक्कम २ लाख ३९ हजार १०० रुपये आहे.सदर गुन्ह्याबाबत आगार वनरक्षक रावेर(अति .का) यांच्या कडील प्र.रि. क्र.०१/२o२४ दि.३ एप्रिल २४ चा जरी केला असून सदरची कार्यवाही मा.उपवनसंरक्षक जमीर शेख सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली अजय नारायण बावणे वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर,वनरक्षक सुपडू सपकाळे,वाहन चालक विनोद पाटील यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.