Just another WordPress site

यावल शहर शिवसेना शिंदे गटाच्या तक्रारीची दखल घेत नगरपालिका प्रशासनाची कामाला सुरुवात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.६ एप्रिल २४ शनिवार

येथील नगरपालिका कार्यक्षेत्राच्या हद्दीतील आसाराम नगर परिसरातील उद्यानाच्या विविध समस्या संदर्भात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले होते.सदर निवेदनाची त्वरित दखल घेत नारपालिका प्रशासनाच्या वतीने त्या उद्यानाच्या कामाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.

याबाबत यावल शहर शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुखांच्या माध्यमातुन प्रमुख पंकज बारी,सागर कोळी व आदी शिवसैनिकांनी यावल शहर नगरपालिका प्रशासनास यावल शहरातील नगरपालिका कार्यक्षेत्राच्या विस्तारित परिसरातील आसाराम नगर मधील बाल उद्याना ( गार्डन ) च्या स्वच्छता व आदि विविध समस्यांना घेवुन लिखित निवेदन देण्यात आले होते.यात आसाराम नगर सार्वजनिक बाल उद्यानासह शहरातील काही समस्यांचा निराकरण करण्यासंदर्भात त्या निवेदनामध्ये विशेष उल्लेख करण्यात आला होता.सोबत शहरातील अतिशय वर्दळ असलेल्या भुसावळ टी पॉइंटवरील नगरपालिका कॉम्प्लेक्स समोरील धापा चार महिन्यापासून तुटून पडलेला असून सदर धापा तुटून पडल्यामुळे याठीकाणी मोठे खड्डे निर्माण झाले आहेत.या खड्डयात दुचाकी मोटरसायकल व चारचाकी वाहनांचे नेहमी अपघात होवुन अनेकांना दुखापतींना सामोरे जावे लागत असल्यामुळे नगरपालीका प्रशासनाने तात्काळ त्या धाप्यावर पाईप टाकून त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने यावल शहरप्रमुख पंकज बारी यांनी सादर केलेले निवेदनाद्वारे केली होती.त्यानुसार नगरपालिका प्रशासनाच्या वतीने बांधकाम अभियंता यांनी तात्काळ तक्रारीची नोंद घेत सर्वप्रथम नगरपालिका प्रशासनाने शहरातील विस्तारित नविन वसाहतीमधील आसाराम नगर बाल उद्यानाच्या स्वच्छता कामास प्रत्यक्षात काल दि.५ एप्रील शुक्रवार रोजी सकाळपासुन कार्यआरंभ केल्याने परिसरातील नागरीकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.