“सगेसोयऱ्यांचा निर्णय घेईल, त्याच्या बाजूने उभे रहा” !! लोकसभा निवडणुकीबाबत मराठा समाज कोणाच्या बाजूने? याबाबत मनोज जरांगे पाटील यांची भूमिका !!
पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.८ एप्रिल २४ सोमवार
मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीत कोणालाही उमेदवारी व पाठिंबा दिलेला नसून कोणीही समाजाचे व माझे नाव वापरू नये.उमेदवार होण्यापेक्षा पाडणारे व्हा,त्यात मोठा विजय आहे तसेच सगेसोयऱ्यांचा निर्णय घेईल त्याच्या बाजूने उभे रहा अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.मराठा समाजामध्ये शंभर टक्के रोष असून तो या निवडणुकीत नक्कीच दिसेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
जरांगे पाटील रविवारी पुणे पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आले होते त्यावेळी पिंपरी- चिंचवडमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.समाजाच्या मनात खदखद आहे.आरक्षण देऊ म्हणाले पण दिले नाही.शासनाने धोका दिला आहे व त्याला मुख्यमंत्री,गृहमंत्री जबाबदार आहेत.सगेसोयऱ्यांची अधिसूचना काढून अंमलबजावणी केली नाही.५७ लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत.मराठा समाजामध्ये शंभर टक्के रोष आहे तो या निवडणुकीत नक्कीच दिसेल.आमचा मार्ग हा राजकीय नसून आम्हाला आरक्षण महत्त्वाचे आहे त्यामुळे आम्ही कुठेही उमेदवार दिला नाही किंवा कुठल्या पक्षाला पाठिंबा दिला नाही.मराठा समाज हुशार आहे.समाजच ही निवडणूक हातात घेऊन ज्याला पाडायचे आहे त्याला पाडेल असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.