राजकारणी लोकांनी विकास कामे करत असतांना समाज सेवेकडे दुर्लक्ष करू नये – मधुसूदन कोवे गुरुजी यांचे प्रतिपादन
यवतमाळ-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० एप्रिल २४ बुधवार
माऊली वृद्धाश्रम धोत्रा येथे ग्राम स्वराज्य महामंचच्या वतीने वृध्दाश्रमातील ” निराधारांना आधार ” म्हणून स्वादिष्ट भोजन आणि शेला दुपट्टा असा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुसूदन कोवे गुरुजी,अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अशोकराव उमरतकर,कृष्णाजी भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ आणि श्रीमती आशाताई काळे संचालिका ग्राम स्वराज्य महामंच हे उपस्थित होते.प्रसंगी माऊली वृद्धाश्रमचे संस्थापक अध्यक्ष सुरेंद्र रुद्राक्षवार यांनी वृध्दाश्रमा तील अनेक समस्या तसेच देणगी देणारी माणसे बोटावर मोजण्याइतकीच आहे तसेच शासनाकडून अनुदान मिळत नसून राजकारणी लोक फक्त विकासाच्या गोलगप्पा करत असून सदर वृध्दाश्रमाकडे दुर्लक्ष करीत असल्याची बाब त्यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिली.परिणामी वृद्धांच्या आरोग्याची दक्षता लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे तसेच वृध्दाश्रमात सरकारने सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि राजकारणी लोकांनी फक्त विकासाच्या गोलगप्पा करु नये असे प्रतिपादन मधुसूदन कोवे गुरुजी यांनी यावेळी केले.दरम्यान ग्राम स्वराज्य महामंचच्या वतीने वृध्दाश्रमातील सर्व वृद्धांना शेला दुपट्टा व बनियन वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सरपंच येसनसुरे आणि सुरेंद्र रुद्राक्षवार यांच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार शेख रुस्तुम यांच्या वतीने करण्यात आले.