यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-
दि.१० एप्रिल २४ बुधवार
तालुक्यातील किनगाव-डोणगाव मार्गावरील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलची इयत्ता ८ वीची आदिवासी विद्यार्थीनी अंजली मन्साराम बारेला हिने नवोदय परिक्षेत नुकतेच घवघवीत यश मिळविले आहे.
केंन्द्रीय नवोदय परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला व दरवर्षाप्रमाणे यावर्षीही इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल किनगावची विद्यार्थीनी अंजली मन्साराम बारेला हीने नवोदय परीक्षेत उत्तीर्ण होऊन स्कुलच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे.इंग्लिश स्कुलच्या माध्यमातुन प्रत्येक वर्षी या परिक्षेत एक ते दोन विद्यार्थी नवोदय परिक्षेत उतीर्ण होतात.यात अंजली मन्साराम बारेला या आदिवासी विद्यार्थीनीच्या नवोदय परिक्षेतील यशाबद्दल स्कुलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील,प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील,उपप्राचार्य राजश्री सुभाष अहिरराव व स्कुलचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच पालकांनी अंजलीच्या यशाबद्दल विशेष कौतुक करून तिला पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.