मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राज्यात भाजपचे सरकार आणण्यासाठी गेल्या दोन-अडीच वर्षांपासून प्लॅनिंग सुरु होते असा मोठा खुलासा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.तसेच मी सातत्याने म्हणायचो हे सरकार पडणार,मी काय वेडा नव्हतो.याबाबतीत मला माहीत होते असेही त्यांनी म्हटले आहे.पुण्यात भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते.दोन अडीच वर्षे मी म्हणत होतो की,आपले सरकार येणार, मी त्यावेळी म्हणायचो तेव्हा मी काही वेडा नव्हतो.मला माहिती होत की आपले सरकार हे नक्की येईल.त्याची योजना माझ्या मनात होती.सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला कार्यकर्त्यांना विश्वास द्यायचा होता.तसेच ४० जणांना बाहेर काढणे सोपे नव्हते. त्यासाठी वेळ लागणार होता परंतु ते आमच्या इच्छेप्रमाणे झाले व आमचे सरकार स्थापन करण्यात आले.
याबाबत आपण योग्य रित्या टाइमिंग साधला आणि आमचे सरकार आले.एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय घेतला आहे त्याला मोठे धाडस लागते.त्यामुळे आम्ही त्याना अंतर जाणवू देणार नाही असेही ते म्हणाले.चंद्रकांत पाटलांच्या या दाव्याने खरेच अडीच वर्षापासूनच शिवसेना फोडणायचे काम सुरु होते का?अशा चर्चाना उधाण आले आहे.