यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.११ एप्रिल २४ गुरुवार
तालुक्यातील दहिगाव येथे राहणाऱ्या तरुणास चुंचाळे फाट्याजवळ गुंगीचे औषध देऊन त्याच्या कडील सव्वा लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांने घेवुन पोबारा केला आहे.
याबाबत मिळालेली माहीती अशी की,तालुक्यातील दहिगाव येथील राहणारे व प्रगतशील शेतकरी मनोहर महाजन हे आपल्या कडील मोटर सायकलने जात असतांना लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने यावल-चोपडा रस्त्यावर एका शेतकऱ्यांकडील सव्वा लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्याने लुटल्याची घटना नुकतीच घडली आहे असून सदरील घटना काल दि.१० एप्रिल बुधवार रोजी हा प्रकार दुपारी चार वाजेचे सुमारास घडला आहे.दरम्यान दहिगाव येथील शेतकरी मनोहर महाजन यांचे चिरंजीव गिरीश मनोहर महाजन यांनी काल दि.१० एप्रिल रोजी दुपारी चुंचाळा येथील शेत मजुरांना मजुरी देण्यासाठी यावलच्या स्टेट बँकेतून ६५ हजार रुपये काढले तसेच मजुरीत कमी पडत असल्याने त्यांचे हातातील पाच ते सहा ग्रॅमची सोन्याची अंगठी सुद्धा मोडली.यात सोन्याच्या अंगठीचे पैसे आणि रोख ६५ हजार असे मिळून एक लाखाचे वर त्याचे जवळ रोकड असतांना ते चुंचाळे गावाकडे जात असतांना त्यांना अज्ञात इसमाने मोटर सायकलवर येऊ दे म्हणून लिफ्ट मागितली त्याला गिरीश महाजन यांनी बसविले असता चुंचाळे फाट्या जवळील औषधीच्या कारखान्याजवळ एका केळीच्या बागेत ओढत नेऊन त्याचे जवळील रक्कम काढून घेतली तसेच मोटरसायकल सुद्धा केळीच्या बागात लपवुन तो अज्ञात चोरटा पसार झाला.सदर घटनेचा प्रकार लक्षात येताच त्याचे वडील व नातेवाईक त्याचा शोध घेण्यासाठी गेले असता तो या केळीच्या बागेत मिळून आला.याबाबत यावल पोलिसात उशिरापर्यंत त्या अज्ञात चोरटयाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात येत असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे.