यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.११ एप्रिल २४ गुरुवार
येथील वनविभागाच्या वतीने काल दि.१० एप्रिल रोजी कार्यवाही करीत चार चाकी वाहनाने विनापरवाना लाकुड तोड करून दोन लाख सपये किमतीच्या वाहनाव्दारे वाहतुक करतांना जप्त करण्यात आले आहे.
या संदर्भात वनविभागाच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,काल दि.१० एप्रील रोजी विवरे ते रावेर रस्त्याने वनविभागाचे पथक शासकीय वाहनाने गस्त करीत असतांना ट्रक क्रमांक एमएच १९ झेड ७८६२ मध्ये अवैध् लाकूड भरलेले दिसले.वाहनचालकाकडे लाकूड वाहतूक परवाना मिळून आला नाही.सदर वनगुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्याने मुद्देमालासह वाहन पुढील चौकशीसाठी ताब्यात घेऊन शासकीय आगार रावेर येथे आणून जमा करण्यात आला.यात निम(पंचरास) जळावू लाकूड घन मीटर १५.०० व ट्रक क्रमांक एमएच १९ झेड ७८६२ जप्त करण्यात आले आहे.या गुन्हे प्रकरणी वनपरीक्षेत्र अधिकारी,संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन यावल यांनी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१( २)ब,४२,५२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.सदरील कार्यवाहीत आनंदा पाटील वनपरीक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन यावल,रमेश थोरात वनपाल,सचिन तडवी पो.कॉ.आनंद तेली,वाहन चालक यांनी सहभाग घेतला.सदर कार्यवाही ही श्रीमती नीनू सोमराज वनसंरक्षक धुळे (प्रा),जमीर शेख,उप वनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव,राजेंद्र सदगीर विभागीय वनाधिकारी दक्षता पथक धुळे,प्रथमेश हाडपे सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक व कॅम्प यावल यांचे मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी,संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन यावल यांनी व त्यांचे पथकातील कर्मचाऱ्यांनी यांनी केली.