यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ एप्रिल २४ शुक्रवार
तालुक्यातील दहिगाव येथील विविध प्रयोगाव्दारे शेती उत्पादनाविषयी तळमळ असलेले तसेच प्रगतीशील शेतकरी समाधान दिलीप चौधरी यांची केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या यावल तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
तालुक्यातील दहिगाव येथील राहणारे तरूण प्रगतीशील शेतकरी समाधान दिलीप चौधरी यांनी अल्पवधीत शेती पिकांच्या उत्पादनाविषयी केलेले विविध यशस्वी प्रयोग लक्षात घेता त्यांनी केलेले तळमळीचे कार्य लक्षात घेता उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या यावल तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.समाधान चौधरी यांना निवड पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ.राहुल बच्छाव यांच्या स्वाक्षरीचे पत्र नुकतेच देण्यात आले आहे.समाधान चौधरी यांच्या निवडीचे संस्थेचे मार्गदर्शक विजयसिंह गायकवाड,राज्य कार्यध्यक्ष सचिन गंगथडे,राज्य सचिव अतुल पाटील,समन्वयक सचिन कोरडे पाटील,तज्ञ संचालक पंढरीनाथ इंगळे,नामदेव वलेकर,हनुमंत चिकने,संजय रांगे,विजय प्रेमचंद पाटीत,वसंत गजमल पाटील,ललित पाटील,पवन पाटील,शेखर पाटील,दहिगाव परिसरातील शेतकरी बांधव व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे.