Just another WordPress site

वन विभागाच्या कार्यवाहीत पाच जिवंत वटवाघुळांची वाहतुक करणाऱ्यास वाहनासह अटक

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१२ एप्रिल २४ शुक्रवार

येथील सातपुडा वनक्षेत्रातील पाल वन विभागाअंतर्गत येणाऱ्या वैजापुर वन विभागातुन गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या पथकाने पाच जिवंत वटवाघुळांची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या परप्रांतियाचे चारचाकी वाहन जप्त करण्याची कार्यवाही करून त्यास अटक करण्यात आली असल्याचे वनविभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

याबाबत वनविंभागाच्या सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की,यावल वनविभागाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या वैजापुर वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक २२४ या क्षेत्रात वनविभागाच्या गस्तीवर असतांना पथकाने दि.१० एप्रील रोजी एमपी-०९ बि सि ४९३८ या ओमनी सुझुकी वाहनाने वाहन चालक भरासिंग ग्यानसिंग बारेला रा.गुलझीरी पो.पाडल्या बोरवाल जिल्हा खरगोन मध्यप्रदेश याच्या वाहनाची तपासणी केली असता गाडीच्या आत निळया रंगाच्या कॅरेटमध्ये पाच जिवंत वटवाघुळ जातीचे प्राणी मिळुन आले.सदर संशयीत व्यक्तिला वन विभागाने वाहनासह ताब्यात घेतले असुन त्याच्याविरुद्ध वनजिव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९ व वन्यजिव संरक्षण सुधारणा विधेयक २०२२ अनुसूचीचा भंग झाल्याने वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर संशयीत व्यक्तिस चोपडा न्यायालयात न्यायालय वर्ग १ समोर हजर केले असता त्यास एक दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.दरम्यान वटवाघुळ हे निशाचर संसर्गजन्य प्राणी असुन पशुधन विकास अधिकारी कर्जाणा यांच्या वतीने त्या पाचही वटवाघूळांना पुनश्च नैसर्गीक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.सदरहू संपुर्ण कार्यवाही ही सहाय्यक वन संरक्षक वनजिव्य वनीकरण प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापुर एस.एम.सोनवणे,चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलीस निरिक्षक श्रीमती कावेरी कमलाकर,वनपाल वैजापुर ईब्राहीम तडवी,वनपाल बोरअजंटी श्रीमती अश्विनी धात्रक,वनपाल कर्जाणा श्रीमती अर्चना गवते,पोलीस कॉस्टेबल विशाल जाधव,वनरक्षक अभिषेक सोनवणे,विजय शिरसाट,लोकेश बारेला,होकाऱ्या बारेला,संदीप भोई, चुनिलाल कोळी,बाजीराव बारेला,श्रीमती हेमलता बारेला,सुशिल कोळी,निखिल पाटील,संदीप पाटील या अधिकाऱ्यांच्या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.