देवेंद्र फडणवीस म्हणतात की आमच्याकडे नरेंद्र मोदींचा चेहरा आहे मात्र तो चेहरा आहे की मुखवटा हे येणारा काळ ठरवेल हा चेहरा अत्यंत भयावह आहे.लोक घाबरत आहेत त्या चेहऱ्याला.भूत आले म्हणतात.लोकांना हा चेहरा नको आहे,गब्बर नंतर कुठल्या चेहऱ्याला लोक घाबरत असतील तर तो मोदींचा चेहरा आहे.शोलेमध्ये एक डायलॉग होता बच्चा सो जा नहीं तो गब्बर आ जायेगा त्याप्रमाणेच यांच्याबद्दल लोकांना वाटते आहे,कधीही टीव्हीवर येतील काहीही घोषणा करतील हा चेहरा लोकांना नको आहे.फडणवीसांना काहीही बोलू द्या पण भाजपाचे नेतृत्व ही भुताटकी आहे असे म्हणत संजय राऊत यांनी मोदींची तुलना शोलेतल्या गब्बरशी केली आहे.संभाजीनगर हे मराठवाड्याचे हृदय आहे या ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय होईल.महाविकास आघाडीबाबत मराठवाडा मला पॉझिटिव्ह दिसतो आहे.कल्याण काळेंच्या मागे आपण सगळे ठामपणे उभे राहिलो तर रावसाहेब दानवे पुन्हा दिल्ली पाहणार नाहीत.आपण हवे तर दानवेंना मर्सिडिझने पाठवू पण त्यांच्या घरी पाठवू असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.एक नंबरचा खोटारडा पंतप्रधान आपल्या देशाला लागला आहे.खोटे बोलण्याची स्पर्धा ऑलिंपिकमध्ये लागली तर नरेंद्र मोदींना सुवर्णपदक मिळेल.आपले सरकार आले तर ही स्पर्धा आपण आयोजित करु आणि मोदींना पाठवू म्हणजे खोटे बोलण्यातले गोल्ड मेडल ते आणतील.मोदींइतके जलदगतीने खोटे बोलणारा माणूस मी पाहिलेला नाही असेही संजय राऊत म्हणाले.