यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१४ एप्रिल २४ रविवार
आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व आगामी सर्व सण शांततेत व निर्वाद साजरे करावे तसेच कायदा सुव्यवस्था व नियमांच्या चाकोरीत सण साजरे करण्यात यावे त्याचबरोबर पोलिसांना गुन्हे दाखल करण्यास भाग पाडू नका असे आवाहन यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी दहिगाव येथे संपन्न झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत केले आहे.
तालुक्यातील दहिगाव येथील दुरुक्षेत्राच्या पोलीस स्टेशनच्या आवारात काल दि.१३ एप्रिल शनिवार रोजी १४ एप्रिल निमित्ताने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली.सदर बैठकीला सरपंच अजय अडकमोल,उपसरपंच देविदास पाटील,विकास संस्थेचे माजी चेअरमन बाळकृष्ण पाटील यांचेसह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.दरम्यान आज साजरी होणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही निर्विवाद व शांततेत तसेच गावकऱ्यांच्या ठरल्याप्रमाणे मिरवणूक काढून शांततेत पार पाडण्यात यावी.यावेळी कुठलाही वाद घडणार नाही व छोट्या मोठ्या कारणांवर वाद करू नका अन्यथा आम्हाला कटू निर्णय घेण्यास भाग पाडू नका असे आवाहन पोलीस निरीक्षक ठाकूर यांनी केले.यावेळी लोकनियुक्त सरपंच अजय अडकमोल,उपसरपंच देविदास धागो पाटील आणि बाळकृष्ण पाटील मुक्तार का पठाण आदींनी मार्गदर्शन केले. सदर बैठकीत विजय बाविस्कर,पी.डी.चौधरी,समाधान चौधरी,वजीर पठाण,ललित पाटील यांच्यासह सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, हे.कॉ.राजेंद्र पवार यांच्यासह गृहरक्षक दलाचे कर्मचारी,शांतता समितीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.