यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१८ एप्रिल २४ गुरुवार
येथील बोरावल गेट परिसरातील रहिवाशी व आपल्या शिस्तप्रिय कार्यातुन शैक्षणीक क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणारे तसेच नगर परिषद संचलीत साने गुरूजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक के.ए.तायडे यांचे अपघाती उपचारा दरम्यान दुदैवी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.सदरील घटनेमुळे शहरात व परिसरात एकच शोककळा पसरली आहे.
या संदर्भातील मिळालेली माहीती अशी की,येथील बोरावल गेट परिसरात राहणारे साने गुरूजी विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक के. ए. तायडे हे काल दि.१७ एप्रील बुधवार रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास त्यांच्याकडील मोटरसायकलने टेलीफोन एक्सचेंज परिसरातुन जात असतांना येणाऱ्या चारचाकी मोटर वाहन क्रमांक एमएच १४ के एफ १४७० या वाहना दरम्यान भिषण अपघात झाल्याने या अपघातात के.ए. तायडे हे गंभीर जखमी झाले होते.दरम्यान त्यांना तात्काळ उपचारासाठी यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्यांच्यावर प्रथम उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले असता उपचारा दरम्यान सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यु झाल्याचे वृत्त मिळाले आहे.याबाबत यावल पोलीस ठाण्यात मात्र अद्याप या अपघाताची नोंद करण्यात आली नसल्याचे वृत्त आहे.