यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ एप्रिल २४ सोमवार
येथील सोने चांदीचे प्रसिद्ध व्यापारी तथा सराफा व्यवसायीक स्वप्निल रवींद्र देवरे यांची नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडी जळगाव जिल्हा सहसंयोजकपदी निवड करण्यात आली आहे.
सदरील निवड भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांच्या सूचनेवरून व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष उमेश कासट यांच्या वतीने सदर नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आले आहे.सदरहू यावल येथील सोन्या-चांदीचे व्यापारी तथा सराफा व्यवसायीक स्वप्निल देवरे यांची भाजपा व्यापारी आघाडीच्या जिल्हा सहसंयोजक पदावर झालेल्या निवडीबद्दल त्यांचे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील,भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी,व्यापारी आघाडीचे मनोज बियाणी,भारतीय जनता पक्षाच्या सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राकेश फेगडे,राकेश पाटील,परीक्षीत बऱ्हाटे,अतिष झाल्टे,हरलाल कोळी सह आदींनी त्यांच्या निवडीचे स्वागत करीत अभिनंदन केले आहे.