उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केला कंत्राटी मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना जोरदार प्रतिउत्तर
मुंबई :-पोलीस नायक वृत्तसंस्था :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हा कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून केला होता.उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील आपल्या भाषणात जोरदार समाचार घेतला.असंगताशी संगत करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री होणे त्यापेक्षा अधिक बरे असा टोला शिंदे यांनी आपल्या भाषणात लगावला.तर मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे.परंतु बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जायचे कंत्राट मी घेतले आहे असा पलटवार एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंत्राटी या शब्दाला पल्याड लावून कंत्राटी या शब्दाची हवाच काढून टाकली.शिंदे पुढे म्हणाले की, मी महाराष्ट्राचा विकास करण्यासाठीचा कंत्राट घेतला आहे.महाराष्ट्र राज्य अधिकाधिक समृद्ध करण्याचा कंत्राट घेतला आहे.गोरगरीब जनतेला न्याय मिळवुन देण्याचा व जनतेचे अश्रू पुसण्याचा कंत्राट घेतला आहे.बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाचे विचार पुढे घेऊन जायचे कंत्राट मी घेतले आहे.तसेच बहुजनांचा सर्वांगीण विकास करण्याचा मी कंत्राट घेतला आहे परिणामी असंगताशी संगत करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यामंत्री होणे त्यापेक्षा फार चांगले असा टोला एकनाथ शिंदे यांनी भाषणातून लगावला.कंत्राट शब्दाचा फायदा दाखवून एकनाथ शिंदे यांनी कंत्राटी मुख्यामंत्री या शब्दाची हवाच कडून टाकली.
आज अधिवेशनाचा शेवटचा दिवसेदिवस होता.या दिवशी राज्य सरकारच्या वतीने विविध निर्णय घेण्यात आले.यात औरंगाबादचे नाव संभाजी नगर,उस्मानाबादचे नाव धाराशिव असे नामकरण करण्यात आले तसेच नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात आले.त्याचबरोबर मुंबईतील बीडीडी चाळीतील पोलिसांना केवळ १५ लाखांमध्ये घरे देण्याची घोषणाही या अधिवेशनात करण्यात आली.