मी रोज इन्शुलिन द्या अशी मागणी केली आहे तरीही मी तुम्ही असे खोटे वक्तव्य कसे काय करु शकता ? तुम्ही हे कसे म्हणू शकता की मी इन्शुलिनचा मुद्दा उपस्थितच केला नाही.तिहार तुरुंग प्रशासनाचे दुसरे वक्तव्य म्हणजे AIIMS च्या डॉक्टरांनी सांगितले की चिंतेचा काही विषय नाही.अरविंद केजरीवाल म्हणाले हा दावाही खोटा आहे. AIIMS च्या डॉक्टारांनी असे कुठलेच आश्वासन दिलेले नाही.त्यांनी माझ्याकडे माझ्या शुगर लेव्हलचा डेटा मागितला त्यानंतर सांगितले की डाटा पाहिल्यावर आम्ही आमचे मत देऊ.मला अत्यंत दुःख वाटते आहे की राजकीय दबावाखाली येऊन तुरुंग अधीक्षक खोट्या गोष्टी सांगत आहेत.मला आशा आहे की तुम्ही कायद्याचे पालन कराल असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.मागच्या आठवड्यात सुनावणीवेळी ईडीने न्यायालयासमोर म्हटले होते की,केजरीवाल तुरुंगात असे पदार्थ खात आहेत जे टाईप टू डायबिटीस असलेल्या रुग्णासाठी धोकादायक आहेत.ते दररोज गोड चहा पित आहेत,मिठाई खात आहेत.ईडीने केजरीवाल यांचा तुरुंगातील १७ दिवसांचा डाएट चार्टदेखील जारी केला होता आता या पत्रावर काही उत्तर त्यांना दिले जाणार का ? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.