“काँग्रेसने अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षण काढून मुस्लिमांना दिले”!! नरेंद्र मोदींचा पुन्हा काँग्रेसवर आरोप !!
राजस्थान-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२३ एप्रिल २४ मंगळवार
“आधी जेव्हा त्यांचे (काँग्रेस) सरकार होते तेव्हा त्यांनी सांगितले होते की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे व याचा अर्थ हे संपत्ती गोळा करून कुणाला वाटणार ? ज्यांची जास्त मुले आहेत त्यांना वाटणार ? घुसखोरांना वाटणार ? तुमच्या कमाईचा पैसा घुसखोरांना दिला जाणार का ? तुम्हाला हे मान्य आहे का ?” असा प्रश्न नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी राजस्थानमधून विचारला होता व त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आजही उमटत आहेत.दरम्यान हे वक्तव्य चर्चेत असतांना असतांना नरेंद्र मोदी यांनी पुन्हा काँग्रेसवर टीका केली आहे. आजही ते राजस्थान येथे बोलत होते.“२००४ मध्ये काँग्रेसची केंद्रात सत्ता आली तेव्हा आंध्र प्रदेशमध्ये एससी आणि एसटीतील आरक्षण कमी करून ते मुस्लिम समुदयाला देण्याचे सर्वांत पहिले काम केले.काँग्रेसचा हा पायलट प्रोजेक्ट होता व हा प्रयोग काँग्रेस संपूर्ण देशात राबवणार होती.२००४ ते २०१० पर्यंत काँग्रेसने चारवेळा आंध्र प्रदेशात मुस्लिम आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न केला पण कायदेशीर बाबींमुळे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या जागृकतेमुळे ते काँग्रेसचे मनसुबे उधळले गेले आहे असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
“व्होट बँकेच्या राजकारणामुळे आरक्षण देण्याचा खेळ करण्यात आला व काँग्रेसने असे प्रयोग जाणूनबुजून केले हे सर्व संविधानाच्या मूळ भावनेच्या विरोधात होते.परंतु काँग्रेसने संविधानाची पर्वा नाही केली,बाबासाहेब आंबेडकरांची पर्वा नाही केली.जेव्हा कर्नाटकात भाजपा सरकार आले तेव्हा संधी मिळाल्यावर त्यांनी एससी एसटीतून काढून घेतलेले आरक्षण दिले.यामुळे काँग्रेसचा देशभऱात चिडपापड झाला.मोदी स्वतःला काय समजतो असे काँग्रेसने विचारले.मोदींना संविधान समजते.बाबासाहेब आंबेडकरांची पूजा करणारा व्यक्ती आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.“काँग्रेस आणि इंडिया आघाडी जेव्हा सत्तेत होते तेव्हा दलित,मागासांचे आरक्षण काढून घेऊन खास जमातीला वेगळे आरक्षण देऊ इच्छित होते हे संविधानाच्या विरोधात होते.आरक्षणाचा हक्क बाबासाहेबांनी दलित,मागासवर्गीय आणि आदिवासींना दिला. काँग्रेस आणि इंडीया आघाडी धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण देऊ इच्छित होते अशी टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.