यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- जळगाव स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी मराठा समाज व समाजातील महिलांविषयी बेताल व अशोभनीय वक्तव्य केले होते.सदरील बेताल वाक्य केल्याच्या कारणावरून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज दि.८ रोजी येथील तहसील कार्यालयात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले तसेच यावेळी जळगाव स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी मराठा समाज व समाजातील महिलांविषयी केलेल्या बेताल व अशोभनीय वक्तव्याबद्दल त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीचे निवेदन यावल तहसीलदार महेश पवार,नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांना देण्यात आले.
या आंदोलनात प्रा. मुकेश येवले,प्रा.अनिल पाटील,भास्कर पाटील,ऍड.देवकांत पाटील,बापू जासूद ,निळकंठ यादव,अतुल यादव,सुनील गावडे, अशोक पाटील,प्रशांत पाटील,अरुण पाटील,लहू पाटील,डी.सी.पाटील,यशवंत पाटील,किरण पाटील,सुधाकर पवार,सुनंदा परदेशी,सिंधुबाई कोळी,माधुरी गुप्ता,विनोद पाटील,द्वारकाबाई पाटील,रवींद्र कोळी,संतोष पाटील,हर्षल महाडे,बि.डी .पाटील,विजय चौधरी,आर.डी.पाटील,ऍड. गोविंद बारी,जिल्हा परिषदचे माजी सदस्य रवींद्र पाटील यांचेसह समाज बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.