Just another WordPress site

किनगाव नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक सि.के.पाटील यांचा सेवानिवृत्तीपर निरोप कार्यक्रम संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२३ एप्रिल २४ मंगळवार

तालुक्यातील किनगाव येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह.संस्था जळगाव संचलीत नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.के.पाटील हे ३० वर्षांच्या प्रदिर्घ सेवेनंतर दि.३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त रविवार दि.२० रोजी त्यांचा सेवानिवृत्ती निमीत्त सन्मानाच्या कार्येक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन व दिप प्रज्वलन करण्यात आले.सेवानिवृत्त मुख्याध्यापक सी.के.पाटील यांनी १ ऑगस्ट १९९४ रोजी नेहरू विद्यालय किनगाव येथे सेवेला सुरूवात केली होती.शारीरिक शिक्षण या विषयाचे शिक्षक असलेले पाटील यांनी ३० वर्षे उत्तम शिक्षण सेवा दिली व दि.३१ मे २०२४ रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत.यानिमित्ताने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

नेहरू विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे चेअरमन व प.स.चे माजी उपसभापती उमाकांत (छोटु आबा) रामराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून किनगाव खुर्दच्या सरपंच रूपाली बबलू कोळी,किनगाव बुद्रूकच्या सरपंच निर्मला संजय पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष बबलू जनार्दन कोळी,जळगाव जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष योगेश भोईटे,जिल्हा मध्यवर्ती बँक लि. किनगावचे शाखा व्यवस्थापक व वि.का.सोसायटीचे चेअरमन विनोदकुमार निळकंठराव देशमुख,जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव बाळासाहेब पाटील,सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम.एच.पाटील,माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.जी.पाटील,सातपुडा माध्यमिक विद्यालय नायगावचे मुख्याध्यापक नायदे,सार्वजनिक विद्यालय चिंचोलीचे मुख्याध्यापक के.एस पाटील,पाटील सुखनाथबाबा माध्यमिक विद्यालय चुंचाळेचे मुख्याध्यापक विजय तेली इ.सह मान्यवर उपस्थीत होते.यावेळी इयत्ता ९ वी ची विद्यार्थिनी साक्षी हेमराज चौधरी व स्मिता भोईटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर सी.के.पाटील यांनी आपल्या सत्कारपुर्तीनिमीत्त मनोगत व्यक्त करतांना आपल्या शैक्षणीक सेवेतील अनुभवांना उजाळा देत कृतज्ञता व्यक्त केली तसेच चेअरमन उमाकांत पाटील यांनी सी.के.पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांनी सत्कारमूर्तींचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्नेहा भोईटे यांनी केले तर आभार एम.डी. शिकोकार यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.