Just another WordPress site

पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे वीज कोसळल्याने घरगुती वस्तूंचे नुकसान;जीवितहानी टळली

पाचोरा-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील नांद्रा येथे गुरुवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास  विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली यावेळी वीज कोसळून गावकऱ्यांच्या घरगुती उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.काही काळ झालेल्या प्रकाराबद्दल गावकरी अवाक झाले.त्याचबरोबर त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.सर्व गावकरी विजेच्या प्रकाशाने व आवाजाने भयभीत झालेले दिसून आहे.काही काळानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आबाल वृद्धांमध्ये आजही घबराट कायम आहे.यात वीज कोसळून अनेक गावकऱ्यांच्या घरगुती वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यांना त्यांच्या नुकसानीबद्दल तात्काळ अर्थसहाय्य्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी गावकरी वर्गातून केली जात आहे.

नांद्रा येथे गुरुवार रोजी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह पावसाला जोरदार सुरुवात झाली व काही क्षणातच एक जोरदार विजेच्या कडाडण्याचा आवाज होऊन ती जवळच असलेल्या शेतात पडली.गावकऱ्यांचे दैव बलत्तर म्हणून यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही  परंतु त्यामुळे गावातील बहुतांश लोकांचे टीव्ही,पंखे,एलईडी लाईट,आरो पाणी मशीन जळाले आहे.यामध्ये नारायण त्रंबक तावडे यांचा एलईडी टीव्ही व पंखा,योगेश सुरेश म्हसाने यांचे दोन पंखे,परमेश्वर नामदेव पाटील यांचे वरचे तीन पंखे,पाण्याचे आरो मशीन व टीव्ही,दुर्गाबाई पवार यांचे दोन पंखे,नंदू सोनवणे यांच्या घरातील सर्व सीएफएल लाईट व फॅन,विनोद आप्पा बाविस्कर यांचा टीव्ही,दोन फॅन व लाईट  अशा वस्तू जळून खाक झालेल्या आहेत.तसेच गावातही भोईवाडा,कोंबडापुरी,शिवाजीनगर व इतर परिसरातही घरगुती उपकरणे जळाल्याच्या घटना समोर आल्या आहेत तरी या अनपेक्षित घडलेल्या घटनेमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपत्ती व्यवस्थापनाकडून या झालेल्या घरगुती उपकरणांचे नुकसानांचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळण्याची मागणी या नुकसानग्रस्त ग्रामस्थांकडून कडून करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.