यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२७ एप्रिल २४ शनिवार
तालुक्यातील सातपुडा क्षेत्रातील दुर्गम क्षेत्रात आदिवासी पाडा वस्तीवर राहणाऱ्या नागरीकांसाठी यावल बस आगारातुन बससेवा सुरू करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन यावल येथील भाजपाचे पदधिकारी डॉ.कुंदन फेगडे यांनी यावल एसटी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.
याबाबत भाजपाचे पदधिकारी डॉ.कुंदन फेगडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेली व मोठया प्रमाणावर आदिवासी बांधव वास्तव्यास राहत भागात असलेल्या अंधारमळी,तिडया मोहमांडली गाव असुन येथून न्हावी, सावदा,फैजपुर शहरांमध्ये आदिवासी जिवनाश्यक वस्तुसह शेती साहीत्य खरेदी तसेच शैक्षणिक कार्यासाठी विद्यार्थी यांना येजा करावी लागते.याशिवाय आदिवासी बांधवांकडे लग्नकार्य असल्यास त्यांना खाजगी वाहनधारकांना जास्त पैसे मोजुन प्रवास करावा लागतो तसेच तातडीच्या उपचारासाठी येणाऱ्या महिला व जेष्ठ नागरीकांना या सर्वांना शहरात येण्यासाठी एसटी बस प्रवास हा सर्वांत सुरक्षीत असुन गरीबांना परवडणारे एसटी बस हे एकमेव साधन आहे.तरी सदरील आदिवासी बांधवांना येण्या जाण्याचे साधन उपलब्ध नसल्याने बससेवा सुरू व्हावी अशी मागणी डॉ.कुंदन फेगडे यांच्याकडे केल्याने त्यांनी तात्काळ यावल एसटी आगाराचे व्यस्थापक दिलीप महाजन यांची भेट घेवुन त्यांना आदिवासी बांधवांच्या प्रवासा संदर्भातील समस्यांची माहिती देवुन यावल आगारातुन न्हावी मार्गे तिडया,मोह मांडली,उसमळी ही बससेवा सुरू करावी मागणी केली आहे.