यावल- पोलीस नायक (प्रतिनीधी) :-
दि.२७ एप्रिल २४ शनिवार
तालुक्यातील विविध ठीकाणी तालुका आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातुन २५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिनानिमित्ताने हिवताप संदर्भात जनजागृती मोहीम राबविण्यात आली.यानिमित्ताने यावल येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तुषार देशमुख,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजू तडवी यांच्या आदेशाने व वैद्यकीय अधिकारी डॉ.तरन्नुम शेख,सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ.दर्शना निकम,तालुका आरोग्य पर्यवेक्षक विजय नेमाडे यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव अंतर्गत उपकेंद्र आडगांव,मालोद,किनगाव,डांभुर्णी,नायगाव व चिंचोली येथे हिवताप मोहीम राबविण्यात आली.
या मोहीमेत आरोग्य सेवक पवन काळे (पाटील),मनोज बारेला,सतीष सोनवणे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांनी सेवा दिली.या मोहिमेत गावात जलताप रुग्ण सर्वेक्षण,कंटेनर सर्वेक्षण,हस्त पत्रिका वाटणे इ. बाबी करण्यात आल्या.तसेच गाव पातळीवर हिवतापाची लक्षणे,उपचार व हिवताप प्रतिरोध उपाययोजनांबाबत नागरिकांना माहीती देवुन जनजागृती करण्यात आली व नागरिकांनी आपापल्या घरातील पाणीसाठे झाकून ठेवणे,घरासमोरील नाल्या वाहत्या करणे,खिडक्यांना जाळ्या बसवणे,शौचालयाच्या व्हेण्ट पाईपला जाळी बसवणे,घरासमोर पाणी साचू न देणे,आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे अशा सूचना यावेळी नागरिकांना देण्यात आल्या.या मोहिमेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथील सर्व कर्मचारी व आशा वर्कर यांनी सहभाग घेतला.