रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ एप्रिल २४ शनिवार
केल्या कामाची मजूरी मागितली म्हणून रागाच्या भरात एका महिलेचा खून केल्याची घटना रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील किहीम येथे समोर आली आहे.या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरु आहे.कमलीबाई किशन पवार असे मयत महिलेचे नाव असून ती गोंधळपाडा अलिबाग येथील रहिवाशी आहे.बांधकाम व्यवसायात कामगार म्हणून त्या कार्यरत होत्या.मुळच्या फुटपाथतांडा,यादगिर कर्नाटक येथील रहिवाशी असलेल्या कमलीबाई या कामानिमित्ताने अलिबाग तालुक्यात स्थायिक झाल्या होत्या.बांधकाम क्षेत्रात मजूरी करून त्या आपला चरितार्थ चालवत होत्या.
किहीम येथील मयेकर वाडीत त्या बांधकामसाठी कामावर गेल्या होत्या तेथे त्यांनी केलेल्या कामाचे पैसे शिल्लक होते हे शिल्लक मजुरीचे पैसे मिळावे यासाठी त्यांनी मल्लाप्पा अर्फ मल्लिकार्जून यांच्याकडे पैश्याची मागणी केली होती.याचा राग आल्याने मल्लप्पा उर्फ मल्लिकार्जून याने डोक्यावर तीक्ष्ण वस्तूचा प्रहार करून त्यांची हत्त्या केली.याबाबतची व्यंकटेश किशन पवार यांनी मांडवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.यानंतर मांडवा सागरी पोलिस ठाण्यात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.दरम्यान आरोपी मल्लाप्पा अर्फ मल्लिकार्जून यास अटक करण्यात आली आहे.